कृषी दिनानिमित्त आदर्श शेतकरी जगण घोडे यांचा सत्कार

0
11

सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.डॉ वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून सर्वत्र राज्यभरात साजरी झाली.याच कृषी दिनाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा झाला.या कृषी दिनाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद बु येथील घोडेवाडीतील शेतकरी जगन्नाथ तुकाराम घोडे यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार माजी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्फत दिला गेला होता दरम्यान शेतकरी घोडे यांच्या शेतीतील मेहनतीची आज कृषी कार्याची कृषी विभागाने दखल घेतली .

कृषिदिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी गंगाधर डी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,जिल्हा कृषी अधीक्षक वाघ,आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्या हस्ते आदर्श शेतकरी जगण घोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, उप प्रकल्प संचालक शिंदे, सागर खैरनार, रामेतीचे सुनील वानखेडकर, इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, बी टी एम हितेंद्र मोरे,कृषी सहाय्यक किरण सोनवणे, टाकेद कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे, पर्यवेक्षक अशोक राऊत आदींसह बहुसंख्य पदाधिकारी शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

टाकेद सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष रुख्मिनी जोशी आदींसह सर्व गावकरी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी आदर्श शेतकरी जगण घोडे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here