
देवळा ; खर्ङे ता देवळा येथील छञपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या शालांत परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला .

खर्डे ता देवळा येथील छञपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करण्यात येत असून, अल्पावधीत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे . संस्था सामाजिक उपक्रमात देखील अग्रेसर असून, नुकत्याच दहावी व बारावीत प्रथम, द्वितीय व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . या स्तुत्य उपक्रमाचे सभासद व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
याप्रसंगी संस्थेचे संचालक दिलीप देवरे,दिपक कुवर, बबन गांगुर्डे, भाऊसाहेब मोरे आदींसह विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव, डॉ.बापूसाहेब सोनवणे, सुनिल जाधव, सुनील उर्फ बापू जाधव , प्रहारचे बापू देवरे , दादाजी गांगुर्डे, ङिगबर गांगुर्डे, संतोष पगार, सुनिल पगार,आबा कुवर, शशीकांत ठाकरे, सचिन गांगुर्डे, मनोज निकम,भूषण जाधव,रोशन थोरात,विक्की पवार व पालक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम