Skip to content

कसारा घाटात क्रुझरचा अपघात; ११ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू तर ७ जखमी


नाशिक-मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंट वळणावर क्रूझरचा अपघात झाला. अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. इतर ७ जण जखमी आहेत.

कसारा मार्गावर जालनाहून मुंबईकडे जाणारी क्रूझर ही भरधाव वेगात घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले. क्रूझर पलटी झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर धडकली. प्रवासी बाहेर फेकले गेले.

या अपघातात दर्शना विजय कांबळे हिचा मृत्यू झाला. लहान मुलीचे वय अकरा वर्षे होते. तर इतर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी टोल पेट्रोलिंग टीम , महामार्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य घटनास्थली मदतीला पोहचले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!