Skip to content

पालघर येथे सॅटेलाईट’ विमानतळ उभारण्याचा सरकारने घेतला मोठा निर्णय


मुंबईच्या विमानतळावर दिवसेंदिवस प्रवासांची रहदारी वाढत आहे. मुंबईतील विमानतळावर सध्या प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच ठाणे, कल्याण, वसई, विरार या भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. याकरिता पालघर जिल्ह्यात नवीन छोटय़ा विमानांसाठी ‘सॅटेलाईट’ विमानतळ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालकांच्या बैठक पार पडली. पालघर जिल्ह्यात विमानतळ उभारण्यासाठी तब्बल ३०० एकर जमिनी सध्या उपलब्ध असून, सरकारी जागांचा अहवाल तातडीने सादर करत प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत प्रशासनाला दिले.

पालघर येथे विमानतळ उभारल्यास मुंबई विमानतळावरील 50 टक्के ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली.

जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची पालघर जिल्ह्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील भार कमी करून पालघरमध्ये नवीन अत्याधुनिक विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने देखील पालघरमध्ये सरकारी जमिनीची उपलब्धता असून, एमएमआरडीएच्या विस्तारित क्षेत्रातील प्रवासी आणि पर्यटकांना हे विमानतळसोयीचे ठरणार आहे.

 

 

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!