आधी वाढदिवस साजरा केला; मग पत्नी, मुलाची चार्जरनं गळा आवळून हत्या, स्वत:लाही संपवलं

0
1

दुर्ग:   छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. उतई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उमरपोटी गावात एका व्यक्तीनं पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली. उतई पोलीस घटनेचा तपास करत आहेत. भोजराज साहू नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी ललिता साहू, ४ वर्षांचा मुलगा प्रवीण कुमार यांची मोबाईल चार्जरनं गळा आवळून हत्या केली. तर २ वर्षांचा मुलाच्या तोंडावर उशी दाबून त्याला संपवलं. यानंतर भोजराज साहूनं गळफास लावून आत्महत्या केली.

दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला. बुधवारी पतीनं पत्नीचा वाढदिवस साजरा केला. मृत भोजराज मजूर म्हणून काम करायचा. २०१७ मध्ये त्याचा विवाह झाला होता. भोजराजचे आई, वडील आणि भाऊ त्याच्याच सोबत राहायचे. मात्र घटनेवेळी त्यांच्यापैकी कोणीही घरात नव्हतं. सध्या या प्रकरणाचा तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरातील बिछान्यावर आढळून आले. तर भोजराजचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्थितीत पोलिसांना आढळला. बुधवारी भोजराज कामावर गेला नव्हता. त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याचा पत्नीसोबत वाद झाला. भोजराजनं खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला आणि मग मोबाईल चार्जरच्या वायरनं पत्नी, मुलाचा गळा आवळला अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. त्यानंतर त्यानं २ वर्षांच्या मुलाचं तोंड उशीनं दाबलं आणि त्याला संपवलं. तिघांची हत्या केल्यानंतर त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here