जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे एकमेकांना ‘आव्हान’

0
2

द पॉईंट नाऊ: जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सभासद असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याने त्याचे परिणाम जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमटले असून, गेल्या दहा वर्षांपासून बिनविरोधची परंपरा जपणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यंदा मात्र एकमेकांना आव्हान दिले आहे. संचालकांच्या एकूण पंधरा जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, सहकार व आपला पॅनलमध्ये सरळ सरळ लढत असली तरी, अपक्षांनी देखील आव्हान उभे केले आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी साऱ्यांनीच प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येक विभागातील मतदारांची संख्या लक्षात घेऊन विभागनिहाय जागाही वाटप करण्यात येऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना एकत्र करून दाखल केले असल्याने त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही गटाकडून पॅनलची निर्मिती करण्यात येऊन सभासदांना निवडणुकीला बिनविरोध निवडीसाठी लवादही नेमण्यात आला. त्यात जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना पाचारण करून आपापल्या समर्थकांना माघार घेण्यासाठी राजी करण्यात आले व निवडणूक बिनविरोध करण्यात एकमत झाले. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्याकडे जाताना काहींनी एकापेक्षा अधिक जागांवर अर्ज दाखल केले असल्याने त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही गटाकडून पॅनलची निर्मिती करण्यात येऊन सभासदांना निवडणुकीला जावे लागले.
प्रमोद निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार तर विजय हळदे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनल अशी सरळ लढत होत आहे. मात्र, यातील आपला पॅनलचे काही उमेदवार पॅनलमध्येही उमेदवारी करीत असून, अपक्ष उमेदवारी केल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

आपला पॅनलचे उमेदवार

सर्वसाधारण गट- भाऊसाहेब गांगुर्डे, ज्ञानेश्वर गायकवाड, रोहिदास जाधव, दिनेश टोपले, कानिफनाथ फडोळ, योगेश बोराडे, दिनकर सांगळे. तालुका प्रतिनिधी- बापुसाहेब अहिरे, प्रवीण कांबळे, विनय जाधव. ओबीसी गट- प्रकाश थेटे. भटक्या विमुक्त संदीप दराडे. अनुसूचित जाती- प्रदीप अहिरे. महिला गट- संगीता ढिकले, सुमन पाटील.

सहकार पॅनलचे उमेदवार

सर्वसाधारण गट- सचिन अत्रे, अमित आडके, रवींद्र थेटे, रंजन थोरमिसे, नितीन पवार, चंद्रशेखर पाटील, सचिन पाटील, तालुका प्रतिनिधी- किशोर अहिरे, गणेश गायकवाड, नंदकिशोर सोनवणे, ओबीसी गट- विक्रम पिंगळे, भटक्या विमुक्त- अनिल दराडे, अनुसूचित जाती-मंगेश जगताप, महिला गट- अर्चना गांगोडे, सरिता पानसरे.

अपक्षांचेही आव्हान

या निवडणुकीत अपक्षांनीही आपले काहींचे आव्हान उभे केले आहे. त्यात छाया पाटील, शीतल शिंदे, दिनकर सांगळे, दिनेश टोपले, किशोर वारे आदींचा समावेश आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here