नाशिक हादरलं! निफाडच्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या; कारण समोर येताच पोलीस हादरले

0
16

नाशिक | आर्थिक विवंचनेत असलेल्या निफाडमध्ये राहणाऱ्या तरुणाने सीबीएसनजीकच्या लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडलेली आहे. शुभम प्रल्हाद गोळे (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शुभमकडे बनावट शासकीय ओळखपत्र आढळले असून त्याने शासकीय नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करत आहेत.

Crime News | एक कोटींची लाच स्वीकारताना अधिकारी जाळ्यात…

CBI येथील मेळा बसस्थानकासमोरील लॉजमध्ये गुरुवारी (दि. २) सायंकाळी साडेसहाला लॉज कर्मचाऱ्यांना एका खोलीत शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांनी तातडीने सरकारवाडा पोलिसांना माहिती दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर हे उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे यांच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर अकस्मात मृत्यू दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. शुभम हा निफाड येथील रहिवासी असून त्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Onion Rate | कांद्याच्या दरांत आणखी घसरण..;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

शुभम वर्षभरापासून रेल्वेत नोकरीला असल्याचं घरी आणि गावी सांगायचा. त्यासाठी त्याने बनावट शासकीय ओळखपत्रही बनवले होते. इतरांनाही त्याने शासकीय नोकरीचे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात त्याने काही जणांकडून पैसेदेखील घेतले होते. हे पैसे त्याने कुठे खर्च केले? त्याचा उदरनिर्वाह कसा सुरू होता? या संदर्भातील तपास पोलिस करत आहेत. परंतु त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झालेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here