Crime News | एक कोटींची लाच स्वीकारताना अधिकारी जाळ्यात…

0
23

Crime News |  सामान्य लोकांची कामं करून देण्यासाठी अनेक अधिकारी लाच घेत असतात.अशाच एका कामासाठी मोठ्या रकमेची लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा चांगलाच दणका बसला आहे. नगर मध्ये शुक्रवारी रात्री उशीरा नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना एक सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावरकर या नगरमध्ये तळ ठोकून होत्या. त्यांच्या पथकाने सापळा रचून एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेताना सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला पन्नास लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला पन्नास लाख रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ह्या त्याने तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

Onion Rate | कांद्याच्या दरांत आणखी घसरण..;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

हि कारवाई कशी करण्यात आली? नेमकं प्रकरण काय आहे? ह्या कारवाईत आणखी काय काय आढळून आलं आहे? या संदर्भातील सर्व माहिती विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी दिलेली आहे. संपूर्ण बाईट बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अशी केली कारवाई

माहितीनुसार, यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला छ. संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक केली. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने १०० mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाचे तब्बल २ कोटी रुपयांचे बिल झालेले होते.

दरम्यान, या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताची सही घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने ठेकेदाराकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर  अधिकाऱ्याविरोधात ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी नगरमध्ये गेले. नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शुक्रवारी रात्री अहमदनगर- छ. संभाजी नगर महामार्गावरील शेंडी बायपास येथे छापा मारला.

दरम्यान,  लाचखोर सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच घेताना रांगेहाथ अटक केली. या प्रकरणात तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील ५०% वाटा असल्याची कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिल्याची माहिती मिळाली आहे.

Nashik | धक्कादायक! जिल्ह्यात ५ वर्षांपासून मुलींच्या जन्मदरात घट; चिंताजनक आकडेवारी समोर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here