धक्कादायक! नाशिकरोड परिसरातील एका लॉजमध्ये आलेल्या युवकाचा मृतदेह रुममध्ये ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर लावलेल्या स्थितीत आढळून आलेला आहे. त्या युवकाने रुममध्ये ऑक्सिजनचा प्रेशर वाढवून आत्महत्त्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सूरज विजय साेनवणे (वय. २१, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. सूरज हा गेल्या शनिवारी (ता. २८) पहाटे साडेपाच वाजता नाशिकराेड येथील मद्रास कॅफेच्या वर असलेल्या पूर्वा लॉज येथे आला होता. लाॅजच्या काऊंटवर एक दिवसाच्या मुक्कामासाठी ५०८ नंबरचा रुमदेखील त्याने बुक केला. लॉजच्या नियमाप्रमाणे कर्मचारी करुणाकर दास हा रविवारी (ता.२९) सकाळी बारा वाजता तो चेक आउट करण्यासठी गेला असता, त्यावेळी सूरजने दरवाजा उघडला नाही.
Maratha andoln: मराठा हृदयसम्राट जरांगेंनी घेतला मोठा निर्णय
रुमच्या आतून प्रतिसाद येत नसल्याने त्याच्या मोबाईलवर फोनदेखील केला. तरीही त्याने दरवाजा न उघडल्याने त्यांनी नाशिकरोड पाेलिसांशी संपर्क साधला असता पाेलिसांनी लॉजवर पाेहाेचले. पाेलिसांनी रूमचा दरवाजा तोडला आणि आत पाहिले असता सूरज हा बेडखाली पालथा पडलेल्या अवस्थेत होता. त्याच्या ताेंडाला ऑक्सिजनचा मास्क आणि नाका तोंडात रक्त साखाळल्याचे दिसून आले होते. तसेच बाजूलाच एक ऑक्सिजन सिलेंडरदेखील आढळून आले होते. त्यामुळे सुरजने ऑक्सिजन प्रेशर शरीरात साेडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.
Maratha Andoln: मराठ्यांचा वणवा पेटला…! आंदोलनाला हिंसक वळण! बीड-उस्मानाबादमध्ये कलम 144 लागू
दरम्यान, त्याचा मृत्यू कसा झाला यासह चाैकशीसाठी संबंधित लाॅजचालक आणि स्टाफची पोलीस चौकशी करत आहेत. त्याने ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर कुठून तसेच का आणले, याचा तपास सुरु केल्याची माहिती नाशिकराेड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम