Andolan effects: आ.राहुल आहेर चले जाव…! ; डॉ. कुंभार्डे एकतच राहिले तर केदा आहेरांचे आंदोलकांनी केले स्वागत

0
44

Andolan effects: मराठा आंदोलन पेटले असताना राजकीय नेत्यांची देखील चांगलीच पंचायत झाली आहे. याचा फटका लोकप्रतिनिधींना देखील चांगलाच बसत आहे. नेहमीच मुळमुळीत गोलमगोल भूमिका घेणाऱ्या आ. डॉ. राहुल आहेर यांना आंदोलकांनी चक्क ‘चले जाव’च्या घोषणा दिल्यात यामुळे आहेर यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आंदोलकांनी आहेर यांना घेराव घालत आक्रमक भूमिका घेतल्याने चांगलीच नामुष्की आहेर यांच्यावर आली. (Andolan effects)

आ. आहेर चांडवड येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जात असताना आंदोलकांनी त्यांना अडवले. सत्तेत आहेत मग आंदोलनासाठी काय भूमिका घेतली. मराठा म्हणून समाजासाठी काय केले ? राजीनामा कधी देणार ? असे असख्य प्रश्नांची सरबत्ती यावेळी राहुल आहेर यांच्यावर केल्याने त्यांची चांगलीच पंचायत झाल्याचे बघायला मिळाले. नेहमीच सोयीची भूमिका आहेर हे घेत असतात कांदा प्रश्र्नी देखील आहेर यांनी सोपस्कर भूमिका घेतली होती. मात्र त्यांचे सोयीचे राजकारण आंदोलकांच्या लक्षात आल्याने आक्रमक आंदोलकांनी थेट चले जावच्या घोषणा यावेळी दिल्यात. (Andolan effects)

माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी खडसावले

चांदवड देवळा मतदार संघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल आंदोलन स्थळी आल्यानंतर आ. राहुल आहेर हे आंदोलकांना म्हणाले की मी तुमच्यासोबत आहे. यावेळी उपस्थित कोतवाल चांगलेच संतापले तुम्ही कसले आमच्यासोबत आहेत. मराठा म्हणून काय केले ? साधे एक पत्र तरी दिले का असे म्हणत थेट आमदारांवर शाब्दिक हल्ला केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आ. आहेर यांनी मी मराठा आंदोलनात नेहमी कसा अग्रेसर असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांना हे पटले नाही त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदारांना जाण्यास भाग पाडले.

डॉ. कुंभार्डे यांची कोतवालांना मुक सहमती?

आजी – माजी आमदार खडाजंगी होत असताना भाजपा नेते आत्माराम कुंभार्डे यांनी बग्याची भूमिका घेतली जणू त्यांच्या मनातील खदखद माजी आमदार कोतवाल यांच्या तोंडून येत होती की काय अशी चर्चा नंतर रंगली. आपल्या पक्षाच्या आमदाराला आंदोलकांनी हुसकून लावले मात्र डॉ. कुंभार्डे यांनी आमदाराची बाजू देखील घेतली नाही. कोतवाल आ. आहेर यांना झापत असताना कुंभार्डे यांनी साधे बघितले देखील नाही. यावरून चांदवड भाजपा डॉ. आहेर यांच्या बोटचेप्या भूमिकेला वैतागले की काय अशी चर्चा रंगली.

केदा आहेरांचा मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग...

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आंदोलकांच्या भेटी घेत थेट घोषणाबाजी करत समाजा सोबत खंबीरपणे असल्याचे दाखवून दिल्याने मराठा आंदोलकांनी देखील त्यांच्या आक्रमक भूमिकेचे स्वागत केलं आहे. केदा आहेर हे देखील येणारी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र अशात पक्षाचा अथवा अन्य विचार न करता थेट आक्रमक भूमिका घेतली असून सर्व आंदोलकांच्या भेटी घेवून समाजाला जाहीर पाठिंबा देत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचेच भाऊ असलेले आ. राहुल आहेर यांना ‘चले जाव’ तर केदा आहेर यांना मराठा आंदोलक आपले मानून स्वागत करत आहेत यामुळे दोघं भावातील निर्णय घेण्यातील फरक हा आंदोलकांना जाणवला आहे. यावेळी समाजासाठी राजकारण बाजूला ठेवणारे केदा आहेर हे अधिक उठून दिसत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here