Skip to content

जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात योग दिवस साजरा


– विष्णू थोरे

चांदवड: येथील नॅक मानांकित “ अ ” दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ.कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना , विदयार्थी विकास मंडळ , शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जुन २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी दिली.

यावेळी योग प्रशिक्षक ए. बी. येवला यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थीनी आदींना जीवनातील योगाचे महत्व सांगून विविध योगासने, प्राणायाम करण्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले व सर्वांना दररोज योगासने करून आरोग्य सुदृढ राखण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपेश अग्रवाल, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. एस. एस. ठाकरे , शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख प्रा. देवरे एच. एस. व सौ. खैरनार एन. एस. यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे व उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतली.

याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनीं , सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Tags:
Don`t copy text!