शिवसेनेत बंडाळी; एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांची लिस्ट ‘पॉइंट नाऊ’च्या हाती

0
3

मुंबई: शिंदे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवला असून, शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं असून सरकार कोसळण्याची शक्यता वाढली आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. मात्र या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे . तर काही आमदारांनी ठाकरे यांना फोन करून आम्हाला बाहेर काढा असे सांगितल्याची माहिती आहे. तर आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. सेनेत नाराजांची एकदम संख्या वाढली असून शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे हे गुजरात तसेच महाराष्ट्रतील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

कल झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे सोबत तब्बल 35 आमदार आहेत.

एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार ?

मुंबई

1. मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे

मराठवाडा

1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर

कोकण
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले

पश्चिम महाराष्ट्र
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे

ठाणे
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर

उत्तर महाराष्ट्र
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील

विदर्भ
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड

असा घडला घटनाक्रम….!

काल संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदेंसब सर्व आमदार ठाण्यात गेले. एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं. त्यापाठोपाठ दीड वाजता एकनाथ शिंदेंसह आणखी काही आमदार हॉटेलमध्ये पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंसोबत 25 ते 30 शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. स्थानिक भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मदत केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.

सूरतमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना मदत केली आहे, त्यासोबत सूरत पोलिसांनी रात्री याप्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर सकाळी 5 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.

एकनाथ शिंदे घेणार टोकाची भूमिका ?

सेनेचे कड्डावर नेते तसेच निष्ठावंत शिवसैनिक एकनाथ शिंदे हे काही वर्ष नाराज आहेत आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here