Skip to content

जळगावात ट्रकचा विचित्र अपघात; तरुणाचा मृत्यू


जळगावात ट्रालाचा विचित्र अपघात; तरुणाचा मृत्यू

 

जळगाव: शहरातून महामार्गावर क्रमांक ६ वर एका वाहनचालकाने कट मारल्याने पाळधी येथील दुचाकीस व ट्रालाचा विचित्र अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील मागे बसलेले तरुण ट्रक खाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील बिबानगरजवळ मराठा हाॅटेलसमाेर घडली.

नाना नथ्थू माळी (वय ३८, रा. पाळधी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. ते जळगाव येथून पाळधी येथे एमएच-१९, डीक्यू-८७४९ या क्रमांकाच्या दुचाकीवर घरी जात होते. बिबानगरजवळ मराठा हॉटेलसमोर धुळ्याकडून येत असलेल्या आरजे-०१, जीबी-६४६५ या टाइल्स घेऊन जात असलेल्या ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात ट्रकचे चाक माळीच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात अाला. पोलिसांनी ट्रकचालक घनश्याम मगनलाल माली (रा. कोचील, ता. किशनगड, राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे.

ट्रॉलाचा केबिन तुटली
अपघाता झाल्यानंतर ट्रॉलाचा अॅक्सल तुटले. त्यामुळे टाइल्स असलेला ट्रॉला हॉटेलसमोरील खड्ड्यात जाऊन पडला. ट्रकचे समोरील केबिन रस्त्यावरच तुटून पडली

महामार्गावर वाहतूक जाम
अपघातानंतर महामार्गावर आहुजानगरपर्यंत अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!