पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगारांचा मृत्यू

0
27

नाशिक प्रतिनिधी : येथील अंबड जिल्ह्यात दत्तनगर परिसरातील एक दुर्देवी घटना घडली आहे. जाधव संकुल भागात गुरुवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला. परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते.

अंबड येथील दत्तनगर परिसरातील जाधव संकुल येथे कामावर असताना अचानक इमारतीवरून खाली पडला. श्रीरामवृक्ष प्रजापती (वय ३६) असं या व्यक्तीच नाव आहे. हा गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बांधकाम साइटवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून अचानक तोल न सावरल्याने खाली पडला. त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वेळीच तातडीने कामगारांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here