Skip to content

गुवाहाटी येथे शिवसेनेच्या नेत्याला पोलिसांनी केली अटक


द पॉईंट नाऊ ब्युरो : गुवाहाटी येथे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाला पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेचे साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे.

शिवसेनेशी बंड करून गेलेले आमदार एकनाथ शिंदे यांसह गुवाहाटी येथील रॅडीसन ब्लू हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आणि याच आमदारांना परत येण्याचं आवाहन संजय भोसले हे करत होते. याच वेळी त्यांना गुवाहाटी पोलिसांनी अटक केली.

शिंदे यांच्यासह आमदार बंड करून गेल्यापासून अनेक घडामोडी घडत आहेत. या आमदारांना परत बोलावण्याचे अनेक प्रयत्न शिवसेनेने केले. मात्र अद्याप देखील एकही आमदार परत फिरण्यास तयार नाही. आता या आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यासाठी भोसले हे गुवाहाटी येथील त्या हॉटेल समोर गेले. मात्र तिथे कडक पोलीस बंदोबस्त होता. यामुळे पोलिसांनी भोसले यांना अटक केली.

महाराष्ट्रातले राजकारण सध्या ढवळून निघालेले आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. आता अजून पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!