Skip to content

मनोरंजनाच्या नावाखाली इतिहासाचा बाजार थांबवा अन्यथा….


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : मराठी हिंदी चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपट चांगलाच वादाचा विषय बनला आहे. आता कोल्हापूरातील नेसरीकरांनी देखील त्यावर संताप व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित निर्मिती केले जाणाऱ्या चित्रपटांवरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहेत.

दोन दिवसांआधी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक चित्रपटांवरुन निर्माते आणि दिग्दर्शकांना फटकारले होते. तरी त्यांनी यापुढील काळात ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती  करताना भान ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये जर ऐतिहासिक घडामोडींची मोडतोड केली असेल तर गाठ माझ्याशी आहे. अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी इशारा दिला आहे. ह्या बरोबरच नेसरीकरांनी देखील वीर मराठेमध्ये प्रमुख सात वीरांची नावचं बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे.

कोल्हापुरामध्ये वेडात मराठे वीर दौडले सात या येऊ घातलेल्या चित्रपटावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जी नावं बदलली गेली आहेत त्यामध्ये दुरुस्ती होणं आवश्यक आहे. तसे न केल्यास आम्हाला आक्रमक व्हावं लागेल असा इशारा नेसरीकरांनी दिला आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कोणत्याही प्रकारची प्रतारणा केली जात आहे. त्याची मोडतोड केली जात आहे. निर्माते आणि दिग्दर्शक हे मनोरंजनाच्या नावाखाली काय काय करता आहेत हे त्यांना देखील कळत नाही. मात्र त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा संदेश समाजात पसरला जात आहे. ते चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया नेसरीकरांनी दिली आहे.

येत्या काळामध्ये त्या चित्रपटामध्ये ती सात नाव ज्या क्रमानं आहेत त्याच क्रमानं दिसली पाहिजेत. अन्यथा आंदोलन करुन आम्ही आक्रमकपणा दाखवून देऊ. आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. असा थेट इशाराही यावेळी नेसरीकरांनी दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!