Skip to content

सत्तार वादावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर…


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचे नेते व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लील भाषा वापरून केलेल्या टीकेवर खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी एकूण चार ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील एका मंत्र्याकडून काही वाईट शब्द वापरले गेले आणि याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्राभरात उमटली. कारण अशा प्रकारचे शब्द वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशाप्रकारे बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

परंतु सगळ्यांनाच याच भान असतं असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नसले तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती आणि माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक अशी आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे.

मला आवर्जून सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे शब्द वापरून बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसला म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असलं तरी आपण या सर्व प्रवृत्तींना बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुयात. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले  याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!