Winter session | शिंदेंचे आमदार नाराज; त्यांच्याच बड्या मंत्र्यांची केली तक्रार

0
34
Winter session
Winter session

Winter session |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाच्या काही आमदारांनी त्यांच्याच मंत्र्यांच्याविरोधात भयंकर नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांनी दोन ते तीन मंत्र्यांची थेट तक्रार केली आहे. आमदारांची कामं मंजूर होत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.(Winter session)

ह्या मंत्र्यांना अनेक वेळा सांगूनही कामं होत नसल्याच्या तक्रारी यावेळी ह्या आमदारांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आमदारांची मर्जी व पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अॅक्शन मोडवर येतील का? की मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांना पाठिशी घालणार असा सवाल उपस्थित झाला आहे.(Winter session)

 एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी ही अनेकदा चव्हाट्यावर आलेली आहे. पण, पहिल्यांदाच शिंदे गटातील १५ ते २० आमदारांनी तब्बल तीन मंत्र्यांची थेट तक्रार केलेली आहे. गेल्या सहा महिन्यांचा लेखाजोखा ह्या नाराज आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. या अगोदर देखील हे आमदार नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होता.(Winter session)

कोणत्या दोन ते तीन मंत्र्यांवर हे आमदार नाराज आहेत. त्या मंत्र्यांची आणि आमदारांची नावे अद्याप समोर आलेली नाही. हिवाळी अधिवेशन संपताच राज्याचे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात काही मंत्र्याची खाती तसेच मंत्री बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(Winter session)

Agriculture | केंद्राचा मोठा निर्णय! बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी

पक्षांतर्गत नाराजीत वाढ

तानाजी सावंत हे सध्या विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. सध्या त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्याविषयी सत्ताधारी पक्षामध्ये काही भूमिका आहे का? हे बघावे लागणार आहे. तसेच संदीपान भुमरे व दीपक केसरकर यांच्या नावाची देखील मोठी चर्चा होत आहे. दहापैकी दोन ते तीन मंत्री हे कोण आहेत. याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही.(Winter session)

 कोणाची संधी जाणार?

राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच गटातील आमदारांची नाराजी ही सत्ताधाऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता कोणती भूमिका घेणार? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. आमदारांची ही नाराजी मुख्यमंत्री शिंदे हे कशी दूर करणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.(Winter session)

Gold Silver price | सोने-चांदी स्थिरावली; इतके घसरले भाव

ह्या आमदरांना आगामी निवडणुकांना सामोरे जायचे आहे. निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी ह्या आमदारांची कामे होणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर, मंत्री आमदारांची कामे करणार नसतील तर मंत्री बदला अशी थेट मागणी आमदरांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे अॅक्शन मोडमध्ये येतील का? आणि जर अॅक्शन मोडमध्ये आलेक तर कोणाचे मंत्रीपद जाणार हे पाहावे लागणार आहे.(Winter session)

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here