Maharashtra politics| महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वारे फिरणार..? उद्या शक्तिप्रदर्शन होणार..?

0
15

Maharashtra politics|  राजकीय पटलावर काका-पुतण्याचा आपापल्या गटांना ताकद देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. उद्या माढा तालुक्याच्या दौऱ्यावर  शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असून, दोन्ही कार्यक्रमाची वेळ ही एकच सकाळी दहाचीच आहे. त्यामुळे घडळयाच्या काट्यातील नेमकी ही एकच वेळ कोणत्या राजकीय घडामोडींची निर्णायक ठरणार हे बघणे उत्सुकाचे ठरणार आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात बारामतीच्या काका-पुतण्यांचे एकाच दिवशी राजकीय सीमोल्लंघन होणार आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा २३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ हा सोमवारी २३ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, नितीन कापसे यांच्या परिवाराने कापसेवाडी (ता. माढा) येथे द्राक्षबाग शेतकऱ्यांसाठीचा शेतकरी मेळावाही याच दिवशी सकाळी दहा वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.

नितीन कापसे यांनी ह्या मेळाव्यामागे राजकीय हेतु नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी बघता दोन दिग्गज नेते एकाच दिवशी आणि एकाचवेळी कार्यक्रमाला माढा विधानसभा मतदारसंघात उपस्थित राहणार असल्याने चर्चा तर होणारच.

डॉ. भारती पवार यांच्या विरोधात खदखद वाढली; पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

आपापले गडी कोंडीत.. 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here