Skip to content

Lalit Patil case| पोलिसांनी ललित पाटीलला आणलं गुप्तपणे नाशिकला..? नेमकं प्रकरण काय..?


Lalit Patil case|   नाशिक ड्रग्ज प्रकरणाचा गुंता सुटता सुटत नसल्याचे बघायला मिळतंय. नाशिकसह, पुणे, मुंबई पोलीस या प्रकरणामागे हात धुवून लागले आहेत. पण, या प्रकरणातून रोजच काहीतरी रंजक माहिती समोर येत आहे. कधी पक्षाचे पद, तर कधी ललित पाटीलची “लवस्टोरी” अशातच आता अचानक ताब्यात असलेल्या ललित पाटीलला नाशिकला आणलं होत.

त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीसह घरी देखील झडती घेण्यात आली आहे एवढंच नाही तर तपासात असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ललित पाटीलला घेऊन जाण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या ललित पाटिलशी  संबंधित ठिकाणांवरुन पोलिसांना काय धागेदोरे सापडतात का?.  हे बघावे लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून नाशिक ड्रग्स प्रकरण हे चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या ललितचा भाऊ भूषण पाटील यालाही तपासासाठी नाशिकला आणण्यात गेलं होतं.

त्यानंतरच ललित पाटीलला अटक करण्यात आली. आता त्यालाही मुंबई पोलिसांनी काल रात्री नाशिकमध्ये आणून संबंधित ठिकाणांची झडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. तपास कामानिमित्त पोलिसांचे पथक ललित पाटीलला घेऊन आज पहाटे नाशिकमध्ये दाखल झाले होते. पहाटे ४.३० ते ५ च्या सुमारास त्याच्या उपनगर परिसरातील घरी जाऊन झडती घेण्यात आली. तसेच काही साहित्यही ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 Maharashtra politics| महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वारे फिरणार..? उद्या शक्तिप्रदर्शन होणार..?

त्यानंतर पोलिसांनी लगेचच ज्या शिंदे गावात हे घडवलं जात होत, त्या ड्रग्ज कारखान्यावर ललित पाटीलला नेलं. पोलिसांचा दावा आहे की, तो दाखल असलेल्या रुग्णालयातुन एमडी ड्रग्सचा व्यवसाय करत होता. ललित पाटील नेहमी त्याचा भाऊ भूषण पाटीलच्या संपर्कात असायचा.असं पोलिस सांगत आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात आता कोणकोणते नवे पत्ते समोर येतात हे बघणं महत्वाच असणार आहे.

ललित पाटील नेमका कुणाचा?

ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या ललित पाटीलला घेऊन मुंबई पोलिसांनी त्याच्या घराची व कारखान्याची झडती घेतली आहे. काल रात्री उशिरा मुंबई पोलीस त्याला घेऊन नाशिकला आले होते. त्यानंतर आज पहाटे मुंबई पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस ललित पाटीलला घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे, ललित पाटील नेमका कुणाचा..? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पेटत आहे. ड्रग्समाफिया ललित पाटीलवरून एकमेकांचे शाब्दिक टोले लागव्याची आणि आरोप- प्रत्यारोप करण्याची स्पर्धाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आता सांगा ललित पाटील कुणाचा असा सामना सुरु आहे.

डॉ. भारती पवार यांच्या विरोधात खदखद वाढली; पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!