Maharashtra politics| राजकीय पटलावर काका-पुतण्याचा आपापल्या गटांना ताकद देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. उद्या माढा तालुक्याच्या दौऱ्यावर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असून, दोन्ही कार्यक्रमाची वेळ ही एकच सकाळी दहाचीच आहे. त्यामुळे घडळयाच्या काट्यातील नेमकी ही एकच वेळ कोणत्या राजकीय घडामोडींची निर्णायक ठरणार हे बघणे उत्सुकाचे ठरणार आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात बारामतीच्या काका-पुतण्यांचे एकाच दिवशी राजकीय सीमोल्लंघन होणार आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा २३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ हा सोमवारी २३ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, नितीन कापसे यांच्या परिवाराने कापसेवाडी (ता. माढा) येथे द्राक्षबाग शेतकऱ्यांसाठीचा शेतकरी मेळावाही याच दिवशी सकाळी दहा वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
नितीन कापसे यांनी ह्या मेळाव्यामागे राजकीय हेतु नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी बघता दोन दिग्गज नेते एकाच दिवशी आणि एकाचवेळी कार्यक्रमाला माढा विधानसभा मतदारसंघात उपस्थित राहणार असल्याने चर्चा तर होणारच.
डॉ. भारती पवार यांच्या विरोधात खदखद वाढली; पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा
आपापले गडी कोंडीत..
अजित पवार गटाचे पदाधिकारी आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय शिंदे यांच्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणेच आहे. तर इकडे शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते कापसेवाडीत उपस्थित राहणारच. त्यामुळे राजकारणाच्या पटलावर आता काय घडणार..? हे बघणे सर्वांसाठीच औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोणाच्या सोंगट्या कोणाच्या पदरी? हे कळणार.?
आमदार शिंदें बंधुंचा बोलबाला बघता शरद पवारांना या भागात शिरकाव करणे आणि आपली ढासळलेली बाजू अधिक मजबूत करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. सध्या माढ्यात माजी आमदार एस एम. पाटील यांचे सुपुत्र अॅड. बाळासाहेब पाटील आणि करमाळयात संजय पाटील-घाटणेकर यांना सोबत घेत शरद पवार जनाधार वाढविण्यावर भर देत आहेत.
त्यामुळे आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यानंतर लगेचच पंधरा दिवसांत शरद पवार यांचा दौरा होत आहे. पण, एकाच दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या राजकीय फाट्या स्पष्ट होणार आहेत.
Onion Rate| कांद्याच्या दरात दुपटीने वाढ; बळीराजाची दिवाळी होणार गोड…
गर्दी जमविण्याचे तगडे चॅलेंज..
दोन्ही कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावेत. यासाठी दोन्ही बाजूंच्या आमदारांचे स्थानिक समर्थक व कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागलेत. माढा मतदारसंघात घरोघरी राजकीय चर्चेला उधाण आले असून, स्थानिक पुढाऱ्यांना आपल्या नेत्यांच्या मेळाव्याला जास्त लोक यावे यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण, हे नक्की की मतदारसंघात मोठ्या पवारांचे राजकीय वजन जास्त की दादांचे वजन जास्त?. हे पाहण्यासाठी जनता मात्र फार उत्सुक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम