Crime news | कल्याण शहरातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे महत्व सर्वांनाच माहीत आहे. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगत अजूनही तितक्याच भक्कमपणे आणि तकतीने उभा आहे.
पण, याच कल्याण शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवरायांच्या काळातील ह्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बनावट कागदपत्र तयार करून ती जागा नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी बनावट कागदपत्र तयार करून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवण्यात आले होते. दस्तावेज तपासणी दरम्यान कल्याण तहसीलदार ते दस्तावेज कार्यालयाच्या नावाने बनावट पत्र आणि स्वाक्षरी केलेले असल्याचे आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आलं आहे.
तहसीलदार कार्यालयातील प्रीती घोडे यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली आणि याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात संशयित सुयश शिर्के नामक व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुयश शिर्के हा माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कल्याण पोलिस आरोपीचा कसून शोध घेत, प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम