Maratha Reservation | मूळ मागणी करणारे अण्णासाहेब पाटील
मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार संजय मिस्किन असं सांगतात कि, ‘मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला आहे. त्या अगोदर मराठा समाज आरक्षणाच्या संघर्षात कधीही सहभागी झाला नव्हता. मागासलेपण असले तरी मागास म्हणून घेणे हे या समाजाला कमीपणाचं वाटत होतं. मात्र आर्थिक परिस्थिती आणि गावकारभाऱ्याचे पुढारीपण यामधे फारकत करणे या समाजाला जमत नव्हतं.'(Maratha Reservation)
22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला होता. बाबासाहेब भोसले हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मराठ्यांचा हा मोर्चा पाहून सरकारला मराठा समाजाच्या समस्यांची जाण झाली आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू अशी ग्वाहीदेखील दिली. पण दुर्दैवाने सरकार गडगडले आणि आरक्षणाचा निर्णय बासनात गेला होता. दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी समाजासमोर जाऊन काय उत्तर देऊ या स्वाभिमानातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. तेव्हापासून मराठा समाजाच्या संघटित बांधणीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली होती.(Maratha Reservation)
Maratha Reservation | सदावर्ते पुन्हा मराठ्यांना आडवा; आंदोलनाविरोधात पुन्हा कोर्टात धाव…
विनायक मेटे नक्की होते तरी कोण ?
विनायक मेटे हे मराठवाड्यातील एक नेते होते. विनायक तुकाराम मेटे हे एक भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. ते मराठा आरक्षण आंदोलनातील राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर मराठा आरक्षण हा मुद्दा पूर्णतः बाजूल पडला होता. अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण हे मराठा क्रांती मोर्चा पर्यंत तो मुद्दा पुढे नेला होता. विधिमंडळ असो किंवा अगदी रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालय असो अशा प्रत्येक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी सर्वात मोठा सहभाग नोंदवला आहे. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मराठा महासंघातून विनायक मेटे हे प्रभारी म्हणून आलेले होते. विनायक मेटे हे मराठा महासंघात कार्यरत होते. मग अण्णासाहेब पाटील गेल्यानंतर मराठा महा संघाची पूर्णतः वाताहत झाली होती. मग त्यानंतर मेटे यांनी मराठा महासंघाची पुन्हा एकदा बांधणी करण्यात आली. अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी बदलण्यात आले.(Maratha Reservation)
मुंबईत आल्यानंतर बरेच दिवस महासंघाच्या कार्यालयातच झोपायचे. मग सकाळी उठून पुन्हा एकदा मराठा महासंघाच्या कामाला लागायचे. त्यासोबतच लोकांशी त्यांचा परिचय वाढत गेला. त्यानंतर मराठा महासंघाने मराठा आरक्षणाला पाठींबा दिला. त्यावेळी पहिल्यांदा राजकीय संघाने मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दिलेला होता. १९९५ च्या काळात हे सर्व घडल. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनीहि मान्य केलं कि मराठा आरक्षण द्यायला हवं. त्यावेळी एकही अधिवेशन असं नव्हता कि विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला नव्हता. असं अधिवेशन नव्हता कि विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हाउस बंद पाडलं नाही. विनायक मेटे यांना मराठा आरक्षणाची गरज माहिती होती आणि त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष लढादेखील दिला.(Maratha Reservation)
Deola | खर्डे येथील साखळी उपोषणाला माजी आमदार शिरिषकुमार कोतवालांची भेट…
विनायक मेटेंची उणीव जरांगेंनी भरून काढली!
गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. त्याला कारण ठरलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण. मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं होतं.(Maratha Reservation)
काही दिवसांतच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखलही घेतली. परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत. मनोज जरांगे तसे मूळचे बीडच्या मातोरीचे आहे. पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरमध्ये स्थायिक झाले आहे. समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं आहे. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोकोही केले. आता देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनं सुरू आहे.(Maratha Reservation)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम