Nashik News | आज नाशिक जिल्ह्यात असे असणार हवामान

0
15

नाशिक |  हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला पावसाने रविवारी चांगलाच झोडपले. दरम्यान, आज सोमवारी शहर व जिल्ह्यातील काही भागात पावसाची तीव्रता ही कायम राहण्याची शक्यता आहे.

परंतु, गारपीट होण्याची शक्यता कमी असल्याचेही हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. नैऋत्य अरबी समुद्रात वाऱ्यांची स्थिती ही चक्राकार आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परिणामी दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळे परिणामी आज, सोमवार (दि. २७) रोजी नाशिकसह राज्यातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून पुन्हा थंडीची सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय विषुववृत्तीय समुद्र परिक्षेत्रात प्रवेश केलेला ‘मॅडन ज्युलियन ऑसिलेशन’ एकापेक्षा अधिक अॅम्प्लिट्यूडच्या घेराने कार्यरत आहे.
दक्षिण थायलंड तसेच अंदमान-निकोबारच्या दक्षिणेकडच्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे आज  कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यातून चक्रीवादळ निर्माण झाल्यास त्याच्या दिशेवर पुढील हवामानाचा अंदाज हा अवलंबून असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे, पण तरीही गारपिटीची शक्यता नसल्याचेही सांगितले जात आहे. राज्यात मुंबईसह कोकण भागात आज पावसाची तीव्रता ही कमी होण्याची शक्यता आहे. पण, मराठवाड्यात पावसाची तीव्रता वाढून, आज गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातही आज गारपिटीची व उद्या (दि. २८) केवळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here