Skip to content

Viral News | आजी खरं बोली रायनी! अहीराणी भाषेत आजीची सरकारला साद

Viral News

Viral News | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम महाराष्ट्रतील जनतेसाठी सुरू केला असून या मोहिमेमुळे सामान्य लोकांना एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यक्रम आणि कागदपत्रांचा लाभ घेता आला पाहिजे असा यामागील उद्देश आहे. सध्या राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे.

Mumbai | मूल होत नव्हते, म्हणून महिलेने…; हे प्रकरण एकदा वाचाच

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमातून हजारो गरजूंना मदत मिळत असून ही या कार्यक्रमाची जमेची बाजू मानली जात आहे. पण तरीही खरंच ही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. असा प्रश्न उपस्थित होण्यामागील कारण म्हणजे धूळे बस स्टॉपवर एक आजीबाई रोज प्रवाशांकडून पैसे मागत असते. या आजीकडे अहिराणी गाण्यांचा मोठा भांडार आहे.

Viral News | सरकारने जर दिलं असतं तर….

एका प्रसिद्ध वृत्तवाहीनीने या आजीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तिला शासनाकडून मदत मिळवून देऊ, असं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ही आजी तीच्या गावाचं नाव सांगायला तयार झाली नाही. याउलट सरकारने जर दिलं असतं तर मी तुमच्याजवळ तुकडे मागायला आले असते का? असा उलटसवाल ही आजी करताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

PM Modi in Nashik | आई बहिनींवरून शिवीगाळ करू नका – पं. मोदी

सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार, या आजीचं गाव धुळे जिल्ह्यातील ढंडाणे असं असून या आजीला मुलगा नाही अशी माहिती मिळाली आहे. अहिराणी भाषेतल्या या ओव्यांमधून आजीने तीची कहाणी सांगत आहे. राज्य सरकारने धुळे बसस्टॉपवर ठगू आजी सारख्या निराधार आणि गरजू लोकांना मदत करावी अशी आशा आहे.  सरकारच्या योजनांच्या माध्यमातून राज्यातील गरजू लोकांना मदत मिळाली तर या ठगू आजी आणि तीच्यासारख्या निराधार लोकांना बसस्थानकावर कुणाकडून पैसे मागून उदरनिर्वाह भागवण्याची आवश्यकता भासणार नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!