Vidhanparishad | विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; असा आहे निवडणूक कार्यक्रम

0
36
Vidhanparishad
Vidhanparishad

Vidhanparishad | महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया झाल्यानंतर १० जून रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील ४ जागांवरील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, राज्यातील सर्वच शाळांना आणि शिक्षकांना सुट्टी असल्याने याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. निवडणूक आयोगाने संघटनांची ही मागणी मान्य केली आणि निवडणूक स्थगित केली होती. (Vidhanparishad)

दरम्यान, आता पुन्हा नवा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघांतील आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या मतदार संघांमध्ये निवडणुका होणार आहेत. आधी ही निवडणूकांसाठीचे मतदान १० जून रोजी होणार होते. मात्र, आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठीचे मतदान २६ जून रोजी पार पडणार आहे.

Vidhanparishad Election | ठाकरे गटाकडून ‘हे’ उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात..?

Vidhanparishad | या आमदारांचा कार्यकाळ संपणार 

मुंबई पदवीधर मतदार संघाचे संजय पोतनीस, कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे तर, मुंबई शिक्षक मतदार संघाचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचे किशोर दराडे यांची मुदत ७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे या चार जागांवर निवडणुका होत आहेत. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा गुलाल उधळल्यानंतर लगेचच या विधापरिषदेच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू होणार आहे. २६ जून रोजी मतदान तर, १ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. (Vidhanparishad)

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

अर्ज दाखल करणे – ३१ मे ७ जून
अर्ज छाननी – १० जून
अर्ज माघारीची मुदत – १२ जून
मतदान – २६ जून
मतमोजणी – १ जुलै

Teachers and Graduates Election | विधानपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here