Vidhan Parishad election | एक आमदार रुग्णालयातून तर, एक तुरुंगातून मतदानासाठी दाखल

0
197
Vidhan Parishad election
Vidhan Parishad election

Vidhan Parishad election |  आज सकाळपासूनच विधान परिषद निवडणुकीची धूम सुरू असून, आतापर्यंत महायुतीच्या जवळपास सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात असून, यासाठी आज गुप्त पद्धतीने मतदान पार पडत आहे. महायुतीचे 9 उमेदवार तर, महाविकास आघाडीचे 3 उमेदवार उभे आहेत.

दरम्यान, आतापर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 40 आणि दोन अपक्ष अशा एकूण 42 आमदारांनी मतदान केले. तर,  शिंदे गटाच्या आणि भाजपच्याही सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झाले असून, भाजपाच्या 97 आमदारांचे मतदान पूर्ण झाले. मात्र, भाजपचे कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाचे महानगरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या अटकेत आहेत. तर, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचीही प्रकृती ठीक नसल्याने ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार का? असा प्रश्न पडला होता. (Vidhan Parishad election)

प्रकृती बरी नसूनही शहाजीबापू मतदानासाठी दाखल 

मात्र, प्रकृती बरी नसूनही शहाजीबापू पाटील हे मतदानासाठी दाखल झाले असून, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, भाजप आमदार गणपत गायकवाड हेदेखील मतदानासाठी विधानभवनात दाखल झालेत. मात्र, मतदान केंद्राच्या बाहेर वेटिंगवर आहेत. आमदार गायकवाड हे अटकेत असतानाही त्यांना मतदानासाठी परवानगी देण्यात आल्याबाबत काँग्रेसने तक्रार केली होत. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार पाठवण्यात आली असून, अद्याप निकाल न आल्याने गणपत गायकवाड वेटिंगवर आहेत.

Vidhan Parishad Election | कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार..?; 11 जागांचा आज फैसला

Vidhan Parishad election | बच्चू कडू यांच्या येण्याने शिंदेंची ताकद वाढली?

शिवसेना शिंदे गटाचे सध्या एकूण 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे 2 अशा एकूण 9 आमदारांचं समर्थन मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे एकूण 47 आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाचे 2 उमेदवार उभे असून, प्रहार आणि बच्चू कडू यांच्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. महायुतीच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले. (Vidhan Parishad election)

नार्वेकरांसाठी मतं जुळवण्यात उद्धव ठाकरेंना यश येईल का..? 

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांचे मतदान सुरू असून, आदित्य ठाकरे यांच्यासोबत शंकरराव गडाख, नितीन देशमुख, उदयसिंह राजपूत हे आमदारही मतदान करायला पोहोचले. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरे हे मतांची जुळवाजुळव करत आहेत. ठाकरे गटाला अद्यापही 7 मतांची गरज असून, कॉंग्रेसकडे 11 मतं अधिक असल्याने ठाकरे हे विधानभवनातील कॉंग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. त्यामुळे नार्वेकरांसाठी मतं जुळवण्यात उद्धव ठाकरेंना यश येईल का..? हे पहावे लागणार आहे. तर, पराभव स्वीकारावा लागणारा ‘तो’ एक उमेदवार कोण असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad election)

Vidhan Parishad Election | आमदारांना ‘फाइव्ह स्टार ट्रीटमेंट’; मतांची फाटाफूट होण्याची पक्षांना भीती..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here