Vidhan Parishad Election | आमदारांना ‘फाइव्ह स्टार ट्रीटमेंट’; मतांची फाटाफूट होण्याची पक्षांना भीती..?

0
36
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election :  सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, उद्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या हायव्हॉल्टेज निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असून, या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आणि पक्षांच्या नेत्यांनी खबरदारी घेतली आहे. ‘सूरत वाया गुवाहाटी’ नंतर ठाकरे गटाने विशेष खबरदारी घेतली असून, आमदारांसोबत स्वतः आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.

या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने ही धास्ती सर्व पक्षांनी घेतली असून, याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापल्या आमदारांना ‘फाइव्ह स्टार ट्रीटमेंट’ देत आहेत. ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असून, विधान परिषद निवडणुकीची गोळाबेरीज जाणून घेऊयात… (Vidhan Parishad Election)

Vidhan Parishad Election | कोणत्या पक्षाचे किती उमेदवार..?

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीकडून नऊ उमेदवार तर, महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार मैदानात आहेत. यात भाजपने सर्वाधिक पाच अजित पवार गटाने दोन आणि शिंदे गटाने दोन उमेदवार उभे केले आहेत. तर, काँग्रेसने एक, ठाकरे गटाने एक आणि शरद पवार गटाने भारतीय शेतकरी व कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील पाठिंबा दिला असून, असे एकूण तीन उमेदवार महाविकास आघाडीकडून उभे आहेत. (Vidhan Parishad Election)

Vidhan Parishad Election | अवघे चार सदस्य असून दादांचा सभापती पदासाठी हट्ट; ‘या’ निवडणुकीतही युतीत रस्सीखेच

कोणाकडे किती आमदार..?

राज्यात महायुतीचे संख्याबळ अधिक असून, महायुतीकडे 203 आमदार आहेत. यात भाजपचे 103, शिवसेना शिंदे गटाचे 40 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. तर, महायुतीला पाठिंबा असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1, बहुजन विकास आघाडी 2, प्रहार जनशक्ती पक्ष 1 व इतर घटक पक्षांसह महायुतीकडे 203 आमदारांचे संख्याबळ आहे. तर, महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 37, शिवसेना ठाकरे गट 16, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, समाजवादी पक्ष 2, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) 1, आणि इतर घटक पक्षांचे मिळून एकूण 69 आमदारांचा पाठिंबा आहे.

आमदारांचा ‘या’ हॉटेल्समध्ये विसावा

विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफुट होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. दरम्यान, भाजपचे आमदार हे कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये असून, या हॉटेलमधील एका खोलीचे भाडे हे किमान 15 हजार रुपये इतके आहे. तर, शिंदे गटाचे आमदार वांद्रे येथील ‘ताज लॅण्डस एंड’ या हॉटेलमध्ये आहेत. या पंचतारांकित हॉटेलच्या एका खोलीचे भाडे हे 15 ते 25 हजार इतके असून, शुक्रवार व शनिवारचे दर ते 30 हजारांवर आहे.(Vidhan Parishad Election)

ठाकरे गटाच्या आमदारांची व्यवस्था ‘आयटीसी ग्रॅण्ड’मध्ये करण्यात आली असून, येथेही एका खोलीचे भाडे हे 12 ते 15 हजारांवर आहे. यात विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून आमदारांच्या राहण्याची व्यवस्था ही एकाच मजल्यावर करण्यात आली आणि स्वतः आदित्य ठाकरेही आमदारांसोबत याठिकाणी आहेत.

Vidhan Parishad Election | अखेर पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला; भाजपकडून पुनर्वसन झाले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here