Vidhan Parishad Election | अवघे चार सदस्य असून दादांचा सभापती पदासाठी हट्ट; ‘या’ निवडणुकीतही युतीत रस्सीखेच

0
43
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election |  सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकींमुळेही राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, रोज नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. दरम्यान, या सरकारचे शेवटचे अधिवेशन असल्याने तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी निवड होण्याची दाट शक्यता आहे. (Vidhan Parishad  Election 2024)

ऑगस्ट 2022 रोजी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपल्यापासून हे पद रिक्त आहे. दरम्यान, या अधिवेशनात या पदावर निवड होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, या पदासाठीही महायुतीत अपेक्षित चढाओढ पहायला मिळत असून, शिंदे गट दावा करत असतानाच अवघे चार सदस्य संख्या असलेल्या अजित पवार गटानेही यात उडी घेतली आहे.

चार सदस्य असलेल्या अजित पवार गटाचीही उडी 

विधानपरिषदेत अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम हे केवळ चार सदस्य आहेत. मात्र, सभापती पदासाठी अजित पवारांनी थेट विधानसभेच्या जागांमध्ये तडजोड केल्याचीही माहिती समोर आली असून, विधानसभेला कमी जागा द्या पण सभापती पद द्या अशी भूमिका दादा गटाची असल्याचे सांगितले जात आहे. तर, विधान परिषदेत सभापतीपद देण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आल्याचे राष्ट्रवादीतील नेत्यांचे म्हणणे आहे. (Vidhan Parishad  Election)

Vidhan Parishad Election | अखेर पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला; भाजपकडून पुनर्वसन झाले

Vidhan Parishad  Election | निवडणूक प्रक्रिया काय..?

सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपणार आहे. यानंतरचे अधिवेशन थेट विधानसभा निवडणुकीनंतर होईल. दरम्यान, विधानपरिषद निवणुकीच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपाल जाहीर करतात. मात्र, त्यापूर्वी त्यांना निवडणुकीची तारीख निश्चित करण्याबाबतचे पत्र हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवावे लागते. त्यामुळे जर या अधिवेशनात सभापती पदाची निवडणूक घ्यायची असेल तर, आजच मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याबाबतचे पत्र राज्यपालांना पाठवणे गरजेचे आहे. (Vidhan Parishad  Election)

महायुतीत रस्सीखेच; ‘हे’ उमेदवार इच्छुक..?

मात्र, दुसरीकडे या पदावरून महायुतीत चढाओढ सुरू असून, या जागेवर भाजप आणि शिंदे गटाकडून दावा केला जात होता. मात्र, आता यात अजित पवार गटानेही उडी मारली असून, सभापती पदाची मागणी केली आहे. भाजपकडून राम शिंदे, शिंदे गटाकडून निलम गोऱ्हे. तर, अजित पवार गटाकडून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक असल्याची माहिती समोर आली असून, या लढतीत कोण बाजी मारणार..? आणि आता तरी या पद भरले जाणार का..? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

Vidhan Parishad Election | विधानपरिषदेसाठी ‘हे’ असणार भाजपचे उमेदवार..?; संभाव्य उमेदवारांची यादी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here