Igatpuri | ‘पाऊस आला अन् वीज गेली’; इगतपुरी भागातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठक

0
22
Igatpuri
Igatpuri

इगतपुरी :  इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे विजेचा लपंडाव चालू असून या प्रश्नासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी इगतपुरीचे महावितरणचे उपविभागीय अधिकारी सचिन माळी यांना पूर्व भागातील लाईट प्रश्न सोडविण्यात यावा यासंदर्भात निवेदन दिले. या आढावा बैठकीत पूर्व भागातील भविष्यातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यात पूर्व भागातील चाळीस वाड्या वस्त्या व वीस पंचवीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कर्मचारी वर्ग वाढवून दरवर्षीच्या डीपीआर निधीतून जुने स्ट्रकचर बदलण्यात यावे, टाकेद पट्ट्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा.

दरवर्षीच्या डीपीआर निधीमध्ये पावसाळा पूर्व नियोजन नवीन उपाययोजना करण्यात याव्यात, परदेशवाडी सबस्टेशनला जोडणारी व 33 के.व्ही बिघाड होणारी लाईन सुरळीत करण्यात यावी, टाकेदसह परिसरातील फेल होणारे ट्रान्सफॉर्मर जास्त व्होल्टेजचे टाकण्यात यावे, टाकेद सत्याई डी.पीचे ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून 25 व्होल्टचे टाकण्यात यावे, परदेशवाडी सबस्टेशन अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक फिडरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अश्या विविध मागण्या यावेळी या बैठकीत राम शिंदे यांच्याकडून करण्यात आल्या.

यावेळी राम शिंदे, उत्तम मोंढे, संदीप कोरडे, सागर मोंढे आदी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद गट व परिसरात गेल्या महिनाभरापासून मागील दहा बारा दिवसांत सर्रासपणे विजेचा लपंडाव चालू आहे. कायम या परिसरात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असतो. 33kv ब्रेकडाऊन, घोटी सबस्टेशन अंतर्गत परदेशवाडी सबस्टेशनवर अवलंबून असलेले टाकेद परिसरातील सर्वच फिडर सातत्याने कायम बंद असतात.

Igatpuri | जि.प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत वाढदिवस साजरा

या कारणास्तव टाकेद व परिसरातील सर्व गाव व वाड्या वस्त्यामधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दरवर्षी पावसाळा सुरू होताच या भागात 33 kv foult, 11kv विद्युत पोल पडतात, तर अनेक ठिकाणी विद्युत तारा, विद्युत रोहित्र सातत्याने फेल होतात. या कायमच्या समस्येमुळे जवळपास वीस पंचवीस ग्रामपंचायत आणि चाळीस वाड्या वस्त्या या कायम अंधारात असतात.

परिणामी वीज नसल्याने पावसाळ्याच्या काळात या भागातील ऑनलाइन सेवा, मोबाईल, दूरध्वनी हे बंद असतात. या कारणास्तव नागरिकांना अनेक समस्यांना सामोरजावे लागत आहे. दरवर्षी आपले तालुक्याला जिल्हा नियोजन समिती DPDC, महामंडळाकडून पावसाळा पूर्व नियोजन करण्यासाठी DPR फंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असतो. या DPR निधीतून आपण योग्य नियोजन करून जुने जीर्ण झालेले विद्युत पोल, विद्युत रोहित्र, सर्व जीर्ण झालेले विद्युत स्ट्रकचर यंत्रणा वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासोबतच अनेक ठिकाणी पावसाळी वातावरणामुळे ट्रान्सफॉर्मर मार्फत ओव्हर लोड वीज पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट होते.

मागील महिन्यात टाकेद येथील सत्याइ डीपी अंतर्गत वीज पुरवठा होत असलेल्या परिसरातील अनेक मोबाईल दुकान ग्राहकांचे इन्व्हर्टर, बॅटरी, मोबाईल चार्जेर, इलेक्ट्रॉनिक मोटार, इत्यादी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान टाकेद येथील सत्याइ चौकातील डीपी ट्रान्सफॉर्मर हे 15 kv चे असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोड असल्याने सदर ठिकाणी कायम ट्रान्सफॉर्मर फेल होत असतात. तरी सदर ठिकाणी लवकरात लवकर 25 kv चे ट्रान्सफॉर्मर टाकण्यात यावे. सातत्याने याठिकाणी तांत्रिक बिघाड होत असल्याने या परिसरातील नागरिक कायम अंधारात असतात. तरी हे सर्व प्रश्न आपण सोडवावेत अशी मागणी या निवेदनात कऱ्यात आली आहे.

Igatpuri | घोटी-भंडारदरा रस्ता झाला चकाचक; आ. कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे भाग्य उजळले

“टाकेदसह सर्वच गावातील गावठाण कार्यक्षेत्रात 24 तास विभक्त वीज पुरवठा देण्यात येणार असून याचे कामकाज लवकरच पूर्ण होणार आहे. शेतकऱ्यांना 24 तास विभक्त थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येणार आहे. लवकरच पाचपट्टा येथून wind energy प्रोजेक्ट अंतर्गत परदेशवाडी सबस्टेशनला नव्याने 132 kv वीजपुरवठा लाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे टाकेद परिसरातील लाईट प्रश्न कायमचा सुटणार आहे.” – सचिन माळी (उप विभागीय अधिकारी महावितरण, इगतपुरी)

“आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून भरविर भंडारदरावाडी सबस्टेशन मंजुर आहे. यामुळे भविष्यात टाकेद सह संपूर्ण परिसर कायमस्वरूपी 24 तास प्रकाशमय असणार आहे. यांसह वायरमन, कर्मचारी संख्या वाढ होण्यासाठी टाकेद गटासाठी नवीन बाय फरगेशन अंतर्गत विभक्त ग्रामीण उपकेंद्र परदेशवाडी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
– राम शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, टाकेद)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here