Vidhan Parishad Election | नाशिकमधील ठाकरे गटाचा ‘हा’ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात..?

0
23
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election |  ४ जून रोजी लोकसभेचा गुलाल उधळल्यानंतर लगेचच पुढील विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. २६ जून रोजी ४ शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी (Nashik Division teachers Constituency)मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांमध्ये उमेदवारांवरून चांगलीच जुंपलेली असतानाच आता  नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाचे कार्यक्षेत्र हे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर हे पाच जिल्हे मिळून आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. असे असताना ठाकरे गटाचे (Thackeray Group) विधान परिषद आमदार हे शिंदे गटाच्या (Shinde Group) संपर्कात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

या आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी (Election 2024) आजपासून अर्ज विक्री सुरू झालीय सन, ७ जूनपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, १० जून रोजी छाननी, १२ जून रोजी अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. तर, २६ जुन रोजी मतदान आणि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. (Vidhan Parishad Election)

Vidhan Parishad Election | मनसेकडून उमेदवार जाहीर; पण उमेदवारी मनसेची की, महायुतीची..? 

Vidhan Parishad Election | ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात? 

नाशिक शिक्षक मतदार संघाचे ठाकरे गटाचे विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) हे शिंदे गटाच्या संपर्कात असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत महायुतीकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमातही दिसत आहे. त्यामुळे किशोर दराडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र आतापर्यंत याबाबत किशोर दराडे यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, विधान परिषद निवणुकीच्या पार्श्वभूमीवर किशोर दराडे शिंदे गटात जाणार का ? हे पहावे लागणार आहे.(Vidhan Parishad Election)

VidhanParishad Election | ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

काँगेसच्या नेता मविआचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात ? 

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही गटांतील इच्छुकांच्या मोठ्या रांगा असून, काँगेसचे संदीप गुळवे (Sandip Gulve) हेदेखील नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना टीडीएफकडून उमेदवारी मिळाली असून, ते ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा पाठींबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, गुळवे यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पाठींबा देणार का? हे पहावे लागणार आहे.

तर, अहमदनगरनगरचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, ते आजच आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी ते येसगाव येथून नाशिककडे निघाले आहेत. तर, कोल्हेंनाच महायुती पाठिंबा देणार की दुसरा उमेदवार देणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here