Varun Kumar | नुकतीच क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या खेळाडून एका मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या खेळाडूने संबंधित पीडित मुलीवर लग्नाचं आमिष दाखवत वारंवार शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, संबंधित ज्या खेळाडूवर हे सर्व गंभीर आरोप झालेत त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर, नेमका कोण आहे हा खेळाडू आणि काय आहे हे प्रकरण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…(Varun Kumar)
Crime News | प्रेयसीच्या अश्लील व्हिडीओचं मेमरीकार्ड प्रत्येक घरासमोर ठेवलं
Varun Kumar | नेमकं प्रकरण काय ?
या प्रकरणी ज्या खेळाडूवर आरोप करण्यात आले आहेत. तो भारतीय हॉकी संघाचा खेळाडू असून, त्याचे नाव वरूण कुमार असे आहे. बंगळुरू येथे त्याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा खेळाडू आणि संबंधित मुलगी २०१९ पासून एकमेकांना ओळखत होते. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून, तिने बंगळुरू येथील ज्ञानभारती पोलीस ठाण्यात आत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. ही पीडित मुलगी १७ वर्षांची असताना वरूण कुमार आणि हीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी वरूण कुमारची SAI येथे ट्रेनिंग सुरू होती. तर, खेळाडू वरूण कुमार याने पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आले आहेत.
Crime News | खाकीनेच केला घात; मजूर महिलेवर पोलिसाने केला बलात्कार
कोण आहे वरुण कुमार..?
वरूण कुमार हा मूळचा हिमाचल प्रदेश येथील खेळाडू असून, तो हॉकी खेळण्यासाठी पंजाबमध्ये आला होता. २०१७ मध्ये वरूण कुमार हा टीम इंडियाकडून हॉकिच्या मैदानात उतरला होता. त्यानंतर २०२२ मध्ये ‘बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम’मध्ये त्याने रौप्य पदक मिळवले होते. त्यानंतर २०२२ मध्ये ‘आशियाई क्रीडा’ स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या संघातही तो होता. ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये कांस्यपदक जिंकल्यावर हिमाचल प्रदेश येथील राज्य सरकारने त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.(Varun Kumar)
दरम्यान, आता या खेळाडूवर बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आलेले असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानभारती पोलीस हे जालंधरमध्ये आरोपी खेळाडू वरुण कुमार याचा शोध घेत असून, तो फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी अनेक तर्क वितर्क जोडले जात असून, वरुण हा खरंच दोषी आहे. त्यामुळेच तो फरार असल्याचे बोलले जात आहे. (Varun Kumar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम