सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Malegaon | आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा उल्लेख ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून केलेल्या वक्तव्याचा ‘हिंदू मुस्लिम एकता’ संघटनेच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम धर्मामध्ये भानगडी लावण्याचा उद्देशाने वक्तव्य करत आहेत. मालेगावात विज चोरीचा पैसा जिहादी शक्ती वापरतात. हे नितेश राणे यांना जर माहिती आहे. तर, मालेगावच्या पोलीस प्रशासनाला याची माहिती नाही का. मालेगावच्या पोलीस प्रशासनाने आतापर्यंत अशा लोकांवर कारवाया का केल्या नाहीत. नितेश राणेंनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी. मालेगाव पोलिसांनी नितेश राणेंवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जमील क्रांती यांनी केली.(Malegaon)
राणे सागर बंगल्याच्या सांगण्यावरून असे बोलता का..?
आमदार नितेश राणे हा नेहमी सागर बंगल्यावर आपला बॉस बसलाय. आपलं कोणी वाकड करून घेणार नाही, अशी वक्तव्य करतो. मग नितेश राणेने सागर बंगल्याच्या सांगण्यावरूनच असे वक्तव्य केले का? असा सवाल जितेंद्र देसले यांनी केला. नितेश राणे हे वारंवार मालेगावची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. मालेगाव पोलीस आयुक्तालय निर्मिती करावी या मागणीसाठी नागपूर येथे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असताना देखील मालेगावचा उल्लेख त्यांनी ‘मिनी पाकिस्तान’ असा केला होता. आतादेखील वीज चोरीच्या प्रश्नावरून त्यांनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केला आहे.
Nashik News | मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ उल्लेख करणे राणेंना महागात पडले
Malegaon | नितेश राणे यांचे कर्तुत्व शून्य
दरम्यान, “नितेश राणे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचे डोहाळे लागलेले काही लोक असे वक्तव्य करण्यास सांगतात. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायण राणे यांना मुख्यमंत्री पद मिळाले त्यांचे वारसदार म्हणून नितेश राणे हे आमदार झाले. नितेश राणे यांचे कर्तुत्व शून्य आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय बोंब पाडली हे जाहीररित्या सांगावे. मालेगाव हे त्यांच्यापासून सहाशे किलोमीटर अंतरावर आहे. मालेगावच्या प्रश्नात तोंड खूपसू नये. मालेगावचे लोकप्रतिनिधी व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्यक्तिगत आरोपांवरून मालेगावकरांची माफी मागावी यासाठी कोर्टात धाव घेतात.(Malegaon)
नामदार भुसे आक्रमक भूमिका का घेत नाही ?
आता तर सहकारी आमदारानेच थेट मालेगावचा उल्लेख ‘मिनी पाकिस्तान’ असा करत बदनामी केल्यावर नामदार भुसे आक्रमक भूमिका का घेत नाहीत ? करोना काळात मालेगावचे पेशंट धुळ्यात नको, अशी भूमिका घेणारे धुळे-मालेगाव लोकसभा मतदार संघाचे आमदार डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी. खासदार भामरे मनमाड-इंदोर रेल्वे मार्ग व नारपार जिल्हा लिंकिंग प्रकल्प यावर अपयशी ठरल्यामुळे निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर सामोरे जायचे? हा प्रश्न पडल्यामुळे २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन असे धार्मिक भावना भडकविण्यासाठी वक्तव्य केले जात आहेत.
Malegaon News | …. यामुळे पालकमंत्र्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
नितेश राणे हे नेहमी आपला ‘बॉस’ सागर बंगल्यावर बसलाय, असे वक्तव्य करतात. नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर असे वक्तव्य करत असावेत. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून निष्क्रिय ठरत असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मालेगावातील हिंदू-मुस्लिम व इतर धर्मीय नागरिकांची एकता बंधुता व संवर्धन पूर्ण वातावरण शांतता अबाधित राहण्यासाठी ‘हिंदू मुस्लिम एकता संघटना’ प्रयत्न करेल, असे मत निखिल पवार यांनी केली मांडले आहे.(Malegaon)
यावेळी नीचिकेत कोळपकर, खुर्शीद चामडेवाला, असिफ नॅशनलवाले, सोहेल अब्दुल करीम आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जमील क्रांती, निखिल पवार, सोहेल डालरिया, भरत पाटील, इम्रान इजिनियर, सुशांत कुलकर्णी, इकबाल बालेमुकदम, नचिकेत कोलपकर, कलीम अब्दुल्ला, खुर्ची चमडी वाला अंजुम इंजिनियरइनाम सर, इमरान राशीद आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम