Skip to content

Uttarkashi Tunnel Rescue | ‘त्या’ मजुरांवर ही जीवघेणी परिस्थिती का ओढवली?


Uttarkashi Tunnel Rescue | उत्तराखंड टनेलमधील खोदकाम करणाऱ्या 41 कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातून’ सुटका झाल्याचे सर्व देशाने नुकतेच पाहिले आहे. त्याबद्दल 17 दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा तसेच मजुरांनी जे कष्ट घेतले पण हा प्रकार नक्की का घडला? या मजुरांवर ही जीवघेणी परिस्थिती का ओढविलीय़ याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे? अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे नक्की काय घडलं ?

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर नुकतीच सुटका होत आहे. ह्या मजुरांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. उत्तरकाशीतील सिल्क्यारा या बोगद्यात 41 कामगार अडकल्याने संपूर्ण देशाच्या नजरा ह्या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागलेल्या होत्या. ह्या 41 मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सतरा दिवस ह्या अंधाऱ्या बोगद्यात अडकल्याने ह्या कामगारांना हायपर टेन्शनचा त्रास झाला होता. त्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या होत्या. 41  मजुरांसाठी 41 बेडदेखील तयार करण्यात आले होते.

ह्या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली होती. या पाईपमधून NDRF ची टीम ही मजुरांपर्यंत पोहोचली होती. या पाईपद्वारेच मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात आलेले होते. (Uttarkashi Tunnel Rescue)

हा बोगदा नक्की कशासाठी? 

उत्तरकाशी येथील जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर ह्या बोगद्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ‘ऑल वेदर सडक’ सिल्कियारा ही योजना सुरु असून, ह्या प्रकल्पामुळे कोणत्याही वातावरणात याठिकाणी रस्ते वाहतूक ही करता येणार आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री ह्या राष्ट्रीय राज्यमार्गावरील या बोगद्याचं काम सुरु होतं. हा बोगद्याची लंबी ही  4.5 किमी इतकी आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!