Uddhav Thackeray | ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटिस बजावली आहे. ठाकरे गटाच्या मशाल या गीतामध्ये ‘जय भवानी’ हा शब्द असल्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला नोटीस पाठवली आहे. याबाबत आज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर खडसून टिका केली आहे. (Uddhav Thackeray)
गण्यामधून ‘जय भवानी’ शब्द काढा, अशी नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाने पाठवली आहे. आम्ही ‘जय भवानी’ म्हटलं तर त्यातून धार्मिक प्रचार होतो. मग मोदी, शहा हे जेव्हा ‘जय बजरंगबली’ म्हणतात, तेव्हा ते कसं चालतं?. निवडणूक आयोग हे मोदी आणि भाजप सरकारच्या हातातलं बाहुलं असल्याची खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray | ही केमिकल लोचाची केस; यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय..?
उद्धव ठाकरेंनी ऐकवली ऑडिओ क्लिप
दरम्यान, भर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या प्रचारसभेतील भाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. यात नरेंद्र मोदी हे “बजरंग बली की जय, बोलून बटण दाबा”, आमचं सरकार आल्यावर अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करवू, बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना हवं ते बोलता येतं मग आम्हालाच का नाही ? मोदी, शहांना काही वेगळे नियम लागू होतात का?, असं सवाल्हि ठाकरेंनी यावेळी केला. (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray | ते हिंदू धर्माच्या नावावर मतं मागतात
तसेच यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “अमित शहा, पंतप्रधान मोदी हे देवाच्या नावावर मतं मागतात, अशी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली होती. त्यावर अजून निवडणूक आयोगाचे काहीही उत्तर आलेले नाही. ते हिंदू धर्माच्या नावावर मतं मागतात. आम्ही कधीही हिंदू धर्माच्या नावावर किंवा आधारावर मतं मागितले नाही. निवडणूक आयोगाने आधी यावर उत्तर दिले पाहिजे. जर आमच्यावर कारवाई करायची असेल. तर आधी मोदी-शहांवरही कारवाई करा.(Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray | दिल्लीतून उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान
‘भवानी’ शब्द हटवणार नाही
आमच्या मशाल गीतात “जय भवानी” हा शब्द असल्याने निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस पाठवत हा शब्द गीतातून हटवायला सांगितले आहे. या संदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली असून, “मशाल गीतातील भवानी हा शब्द हटवणार नसल्याचं सांगत त्यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे.(Uddhav Thackeray)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम