Skip to content

Galaxy Tab A9 सीरीजचे दोन मॉडेल भारतात लाँच; १३ हजारांच्या आत Samsung चा नवा टॅबलेट


Galaxy Tab A9 | Amazon Great Indian Festival 2023 सेल भारतात ८ ऑक्टोबर पासून सुरु झालेला आहे. या सेलमध्ये फक्त वेगवेगळ्या ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर डील आणि डिस्काउंट ऑफर मिळत नाहीत तर नवनवीन प्रोडक्ट्स देखील लाँच केले जात आहेत. आता अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान Samsung Galaxy Tab A9 सीरीज देशात लाँच झालेली आहे. या सीरीजमध्ये दोन टॅबलेट्स Samsung Galaxy Tab A9 आणि Samsung Galaxy Tab A9+ भारतात लाँच झालेले आहेत. Samsung Galaxy Tab A9 सीरीजचा सर्वात स्वस्त मॉडेल आहे. ज्याची विक्री अ‍ॅमेझॉनवर सुरु झालेली आहे.

Nashik | नाशिकच्या सृष्टीचा ‘मी होणार सुपरस्टार २’ या कार्यक्रमात डंका

Galaxy Tab A9 सीरिजची किंमत

Samsung Galaxy Tab A9 सीरीजचे टॅब Amazon India साइटवर उपलब्ध झालेले आहेत. Samsung Galaxy Tab A9 च्या वायफाय ४ जीबी+६४ जीबी मॉडेलची किंमत १२,९९९ रुपये इतकी आहे. तर वायफाय + ५ जी ४ जीबी+६४ जीबी मॉडेल १५,९९९ रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झालेला आहे. या टॅबची विक्री Amazonवर सुरु झालेली आहे.  SBI कार्डच्या माध्यमातून हा टॅब खरेदी केल्यास ५००० रुपये पर्यंतचा डिस्काउंट दिला जाईल. दुसरीकडे Samsung Galaxy Tab A9+ च्या वायफाय ८ जीबी+१२८ जीबी मॉडेलची किंमत २०,९९९ रुपये आहे. तर वायफाय + ५ जी ४ जीबी+६४ जीबी व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. सध्या हा मॉडेल अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून प्री-बुकिंग करता येईल. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना SBI कार्डच्या माध्यमातून हा टॅब १६,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Galaxy Tab A9 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab A9 मॉडेलमध्ये ८.७ इंचाचा WQXGA LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट ६० Hertz  आणि Resolution 800×1300 पिक्सल आहे. तसेच दुसरीकडे प्लस मॉडेलमध्ये कंपनीनं ११ इंचाचा WQXGA LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hertz  आणि रिजोल्यूशन 1920×1200 पिक्सल आहेत.

A9 टॅबमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आहे. तसेच प्लस व्हेरिएंट Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह आलेला आहे. दोन्ही टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा देण्यात आलेला आहे. सेल्फीसाठी A9 मध्ये 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि प्लस मॉडेलमध्ये  5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दोन्ही टॅबमध्ये कंपनीनं 5100 एमएएचची बॅटरी दिलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!