Skip to content

Nashik | नाशिकच्या सृष्टीचा ‘मी होणार सुपरस्टार २’ या कार्यक्रमात डंका


Nashik | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार २’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडलेला आहे. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये हा महाअंतिम सोहळा रंगला होता. या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवलेली आहे. तर अकोल्याची श्रुती भांडे या कार्यक्रमाची उपविजेती ठरलेली आहे. नाशिकच्या सृष्टी पगारेनं तृतीय क्रमांक पटकावलेला आहे तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर यांना उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे.(Nashik)

Breaking News | फडणवीसांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?-तेजस्वीनी पंडितचं ट्विट

पहिल्या पर्वाप्रमाणेच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळालेला दिसला. यातील छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलेलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून 6 सर्वोत्तम स्पर्धकांनी महाअंतिम फेरी गाठलेली होती. अप्रतिम गाणी सादर करुन मायबाप रसिकांची मनं जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 7 – 8 ऑक्टोबरला पार पडला.

या कार्यक्रमात जालन्याचा संकल्प काळे, अकोल्याची श्रुती भांडे, नाशिकची सृष्टी पगारे, औरंगाबादची रागिणी शिंदे आणि भिवंडीचा काव्य भोईर यांच्यामध्ये महाअंतिम सोहळा रंगला होता. महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक अर्थातच रोहित राऊत, जुईली जोगळेकर, उर्मिला धनगर, प्रसेनजीत कोसंबी, मधुरा कुंभार, आणि शरयू दाते यांनी विषेश देखील हजेरी लावलेली होती.

74 लाखांहून अधिक व्हॉट्सॲप खाती बंद; भारतात Whatsapp ची कारवाई

नाशिकच्या सृष्टीने तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर सृष्टीने मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमच्या  महाअंतिम सोहळ्याचे काही खास क्षण आपल्या सोशल मिडियावर टाकलेले आहेत. यात सृष्टीने मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाची निवेदिका वैदेही परशुरामी हिचे देखील आभार मानलेले आहेत. याच बरोबर तिने विजेता ठरलेला जळगावचा संकल्प काळे याचे देखील अभिनंदन केलेलं आहे. यापूर्वी देखील सृष्टीने गाण्यांच्या कार्यक्रमातून आपली ओळख निर्माण केलेली आहे. नुकताच मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाच्या तृतीय विजेती ठरलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!