Trimbakeshwar | राज्यातील आत्महत्याग्रहस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचे सांगोपण करणाऱ्या नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आधारतीर्थ अनाथ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (वय – १३ वर्षे) या मुलीचा आश्रमातच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Trimbakeshwar | नेमकं प्रकरण काय..?
दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शनिवार रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान मृत मुलगी राधिका ही या आश्रमात अचानक चक्कर येऊन पडली. यावेळी तेथील व्यवस्थापक अशोक पाटील व एक महिला कर्मचारी हे तिला उपचारासाठी त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी तिची तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.(Trimbakeshwar)
Nashik Crime | बेरोजगार मित्रावर विश्वास ठेवणे नाशिकच्या तरुणीला ४० लाखांत पडले
या मुलीचा मृतदेह हा नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. दरम्यान, या घटनेबाबत रुग्णालयाच्या प्राशसनाकडून मिळालेल्या माहितीनुसार “शनिवार रोजी सकाळी ८.५० वाजेच्या सुमारास आधारतीर्थ अनाथ आश्रमाचे कर्मचारी हे मुलगी राधिका हिला घेऊन आले असता, ती मृत असल्याचे आढळून आले.
तपासात काय आढळले..?
मात्र, तपासणी करताना मृत मुलीच्या गळ्याभोवती टॉन्सिलच्या जखमा तर तिच्या पायावर खरचटलेल्याचे आढळून आले होते. दरम्यान, राधिका ही लहान असताना एका महाजाराने आश्रमात दाखल केले होते. तिला कोणीही नातेवाइक नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक बीपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या घटनेची पुढील सविस्तर चौकशी करत आहेत. (Trimbakeshwar)
Pune Crime | धडाधड पाच गोळ्या घालत केला १० वर्षांच्या प्रेमाचा थरारक शेवट
याआधीही या आश्रमात झाला होता ४ वर्षीय मुलाचा खून
याआधीही याच आधारतीर्थ आश्रमात राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलाने त्याच आश्रमातील ४ वर्षीय लहान मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेतच या १३ वर्षीय अल्पवयीन आरोपीने ४ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून त्याची हत्या केली होती. या चिमुरड्याच्या भावासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून त्याने ही हत्या केली होती. दरम्यान, आधारतीर्थ आश्रमात (दि. २२ नोव्हेंबर २०२२) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास या चार वर्षीय मुलाचा मृतदेह हा संशयास्पदरित्या आढळून आला होता. यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालात मृत चिमुरडा आलोक याचा गळा आवळून त्याची हत्या केनयात आल्याचे स्पष्ट झाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम