Thirty First | ‘थर्टी फर्स्ट’ला पार्टी करायचीय; मग हा परवाना काढला का?

0
1
Thirty First
Thirty First

Thirty First |  आगामी थर्टी फर्स्टची राज्यातील तरुणांसह सर्वांनाच उत्सुकता असते. थर्टी फर्स्ट म्हणजेच ह्या वर्षाचा शेवटच दिवस त्यामुळे हा दिवस अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने थर्टी फर्स्ट च्या दिवशी उशीरापर्यंत हॉटेल्पास, वाईन शॉप आणि बार हे सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच आता मद्यपानाच्या शौकिनांसाठी आणखी एक मोठी बातमी आली आहे. तसेच थर्टी फर्स्टच्या दिवशी रात्री १ वाजेपर्यंत मद्यपानाच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.(Thirty First)

यासोबतच मोठ्या शहरांत पहाटे ५ वाजेपर्यंत ही परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, आता बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर, बीड जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी रात्री १ पर्यंत मद्य विक्री आणि बिअर बार हे सुरू राहणार असून, मात्र आता थर्टी फर्स्टला दारू पिण्यासाठी बीडच्या लोकांना एका दिवसाचा तात्पुरता परवाना काढावा लागणार आहे. मात्र, ह्या निर्णयावर बीडचे लोक हे फार काही उत्सुक नसल्याचे दिसत आहे. कारण आतापर्यंत ह्या  परवान्यासाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही.(Thirty First)

Alcohol news | ‘थर्टीफर्स्ट’साठी मद्यप्रेमींना राज्य सरकारची ‘गुड न्यूज’

थर्टी फर्स्टच्या दिवशी चालणाऱ्या पार्ट्यांना तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना राज्य सरकारने मध्यरात्री एक वाजेपर्यंत आणि मोठ्या शहरांमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंतची सूट दिली आहे. मात्र, आता दारू पिण्यासाठी यासाठी एक दिवसांचा एक दिवसाचा तात्पुरता परवाना आवश्यक असून बीड जिल्ह्यात एकानेही हा परवाना मिळवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केलेला नाही.(Thirty First)

त्यामुळे ह्या कारवाईत आता विनापरवाना दारू पिताना किंवा दारू पिऊन वाहन चालवताना देखील कोणी आढळल्यास नव वर्षाचा पहिला दिवस हा त्या व्यक्तीला पोलिस ठाण्यात काढावा लागणार आहे. तर, हा दारु पिण्यासाठीचा वाइन शॉप, बिअर शॉप, तसेच परमिट रूम येथेही मिळू शकणार आहे. तर, ह्या परवण्यासाठी फक्त पाच रुपये शुल्क भरावा लागणार आहे. दरम्यान, एक वर्षासाठी १०० रुपये आणि आजीवन हा परवाना काढण्यासाठी १ हजार रुपये इतके शुल्क आकरले जाणार आहे. पण अशा प्रकारे परवाना घेऊन दारू पिणाऱ्यांची संख्या ही अतिशय कमी आहे.

alcohol rate| मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी… दारूच्या किंमती महागणार..!

अवैध दारू विक्री कराल तर…|(Thirty First)

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यांवर आता राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलिस पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी तब्बल ६१६ गुन्ह्यांची नोंद करत यापैकी तब्बल ५९६ आरोपींना आता पर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईत १ कोटी २४ लाख ३४ हजार ६३४ इतक्या रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची नजर असणार आहे.(Thirty First)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here