Skip to content

नवरदेवाला अतिउत्साह महागात पडला; भरावा लागला तब्बल 2 लाखांहून अधिकचा दंड


द पॉईंट नाऊ ब्युरो : लग्न म्हटलं की नवरदेवासह त्याच्या मित्रमंडळीचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. बहुतांश करून नवरदेवापेक्षा त्यांच्या मित्रांचाच उत्साह अधिक असतो. मात्र एका नवरदेवाला त्याच्या मित्र-नातेवाईकांचा उत्साह चांगलाच महागात पडला.

उत्तर प्रदेश मध्ये एका नवरदेवाचे वऱ्हाड मोठ्या उत्साहात निघाले होते. हे वऱ्हाड 9 गाड्यांमधून जात होते. मात्र या वऱ्हाडातील काही उत्साही नातेवाईक आणि मित्रमंडळी कारच्या खिडकीमधून बाहेर येत डान्स करणे, सेल्फी घेणे अशा कृती करत होते. एक प्रकारे ते वाहतूक नियम पूर्णतः धाब्यावर बसवून चालले होते. मात्र पोलिसांनी या अतिउत्साही मंडळींना चांगलीच चपराक दिली आणि याचा चांगलाच आर्थिक फटका बसला. तोही थोडा थोडका नव्हे, तर तब्बल 2 लाख रुपयांहून अधिकचा.

पोलीस प्रशासन नागरिकांना सतत वाहतूक नियम पाळण्याबाबत सूचना करत असते. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत, यासाठी पोलीस प्रशासन अनेक क्लुप्त्या लढवतात. मात्र नागरिक तरीही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवतात. आणि हे नियम पायदळी तुडवनं नवरदेवाला चांगलच महागात पडलं. तब्बल 2 लाख रुपयांचा दंड त्यांना भरावा लागला. यामुळे मोठ्या उत्साहात लग्नाला निघाले असतांना, साऱ्या आनंदावर खूपच महागडे विरजण पडले.

हरिद्वारकडून नोएडाकडे जात असताना, एका तरुणाने हा या अतिउत्साही वऱ्हाडी मंडळींचा व्हिडीओ काढून पोलिसांना टॅग केला होता. आणि पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या अतिउत्साही नवरदेवास थेट 2 लाख 2 हजारांचा दंड ठोठावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!