निघणार होती लेकीची ‘डोली’, मात्र निघाली बापाची ‘अंत्ययात्रा’ ; अवकाळीने शेतकऱ्यांचे हृदय पिळवटले

0
3

अंकुश सोनवणे | द पॉइंट नाऊ

पीक कापणीसाठी तयार होते. मजुराला आगावू रक्कम देखील देण्यात आली होती. मुलीचे लग्न देखील ठरले होते त्याची पूर्ण तयारी झाली, पण अचानक नियतीने घाला घातला ? परतीच्या मान्सूनने कहर केला आणि सर्व काही स्वप्न पाण्यात वाहून गेले. जे उरले ते सडले, मार्केट ला गेले नाही पैसा भेटला नाही एका क्षणात होत्याचं नव्हत झाल. ही घटना आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव येथील शेतकऱ्याची या सर्व निसर्गाशी परिस्थितीशी लढता लढता हार पत्करून शेवटी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या नशिबी ही परिस्थिती कायम अशीच असेल तर हा देश खरच कृषिप्रधान आहे का हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडले नाही किंवा शेवटचेही नाही. मात्र आपल्याला हा प्रश्न नक्की पडतो हे अजून किती दिवस चालणार ? जो राब राब राबतो त्याच्या नशिबी ही दुर्दशा अजून किती दिवस असणार हे अनुत्तरीतच आहे.

सुजलाम सुफलाम महाराष्ट्र म्हटले जाते, मात्र याच गौरवशाली महाराष्ट्रात यावर्षी १९०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मेल्यावर शेतकऱ्याला 1 लाख 2 लाख मदत केली जाते मात्र त्याच्या आयुष्याची किंमत खरच इतकी शुल्लक आहे का ? यावर विचार करणे गरजेचे आहे. मेल्यावर मदत करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधीच का बाजारभाव देत नाहीत. योग्य त्या उपाययोजना का करत नाहीत. नंतर मदत करायची किरकोळ अनुदान द्यायचे आणि ते लोकांच्या नजरेत येवून पुन्हा नोकरदारांनी शेतकऱ्याला फुगट्या म्हणून हिनवायचे हे अजून किती दिवस चालणार याकडे शासनाने गांभिर्याने बघणे गरजेचे आहे.

प्रत्येक वेळी निवडणुक आली की शेतकरी आठवतो, भरमसाठ आश्वासन दिले जातात. निवडणूक जिंकण्यासाठी सरकारच्या मोठ्या योजना येतात जातात. शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी बघाल शेतकरी माणसे नाहीत का त्यांना हलक्यात अजून किती घेणार. शेतकरी संघटित नाही म्हणून हे सर्व राज्यकर्त्यांचे फावते आहे. शेतकरी मेला की मदत देवून गप्प केले जाते. खते बियाणे यांच्या भरमसाठ किमती वाढवल्या बाजार भाव मात्र तसेच असतात, समस्याही तशाच राहतात. केजच्या संतोष दौंड नामक शेतकऱ्याचे वय चाळीस त्याला तीन मुली आणि एक मुलगा आता त्याने तर अजून नातवाचे तोंडही बघितले नव्हते. मात्र या परिस्थितीशी त्याची झुंज अयशस्वी ठरली अन् आपले जीवन संपवले. आता या लेकरांचा सांभाळ कोण करणार याकडे आपण लक्ष देणार का ?

परतीच्या मान्सूनचा कहर सुरूच आहे, या वेदनेला मलम नाही

शेतकरी हा सर्वात जास्त प्रामाणिक असतो संतोषचे सोयाबीन पीक तर उद्ध्वस्त झालेच, कापूसही भिजला. संतोष पूर्ण निराश झाला होता. तो शेतात गेला असता तो परतलाच नाही. कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मराठवाड्यात हवामानाचा सातत्याने फटका शेतकऱ्यांना बसत आहे. प्रथम अवकाळी पाऊस त्यानंतर जोरदार पाऊस मान्सून परतत असतानाही प्रत्येक थेंबावर शेतकऱ्याला उद्ववस्थ होण्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना आपली पिके कशी वाचवायची हेच समजत नाही.

23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान

निसर्गाच्या लहरी पणामुळे इतके शेतकरी मरत असताना सरकार चालवणाऱ्यांचे हृदयही माणसाचे आहे मात्र तरीही विलंब होतोच, राज्यातील २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे. हे प्रोत्साहन अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. पहिली यादी 8.29 लाख शेतकऱ्यांची असेल. त्यांना 4000 कोटींचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात 10 लाख शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 4.85 लाख शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

सरकार पाऊले उचलत आहे तरीही आत्महत्या का थांबत नाहीत ?

या याद्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होतील. आधार कार्डची पडताळणी केल्यानंतर 18 ऑक्टोबरपासून पैसे हस्तांतरण सुरू होईल. एका वेबसाइटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. कोण म्हणतं सरकार काहीच करत नाही ? सरकार खूप काही करत आहे… मात्र खेदाची गोष्ट आहे… शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरीही थांबत नाहीत….


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here