Skip to content

निताने – ग्रामपंचायत सदस्य संजय देवरे यांना मातृशोक; सुमनबाई देवरे यांचे वृद्धापकाळाने निधन


निताने (बागलाण) : निताने येथील ग्रामपंचायत सदस्य संजय देवरे व शेतकरी दिलीप देवरे, सुशीला सावळा यांच्या मातोश्री सुमनबाई नानाजी देवरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या.

निताने पंचक्रोशीत कै. सुमनबाई देवरे यांच्याबाबत विशेष आपुलकी होती. गावात प्रत्येकाला सढळ हाताने मदत करणे व त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी विशेष जिव्हाळा प्रत्येकाच्या मनात निर्माण केला होता.

दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर, नुकताच त्यांचा पंचक्रीया विधी पार पडला. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांचे निधन झाल्याने, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे एक मुलगी, दोन मुले, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कै. सुमनबाई देवरे यांचे पती कै. नानाजी वेडू देवरे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा देखील मृत्यू ऑक्टोबर महिन्यातच झाला असल्याने, कै. सुमनबाई देवरे यांचा मृत्यू जीवाला चटका लावून जाणारा ठरला.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो..!!💐💐


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!