Crime news | एखाद्या चित्रपटातील सीनलाही लाजवेल अशी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. एका दुचाकीची धडक बसून रस्त्यावरील भिकारी गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण, त्यानंतर पोलिसांनी त्याचे सामान तपासले असता, त्यातून त्यांना जे सापडले, ते बघून सर्वांचेच डोळे विस्फारले.
त्या भिकाऱ्याच्या गोधडीत पोलिसांना चक्क लाखो रुपये सापडलेत. एवढेच नाहीतर, अनेक बँकांची पासबुके, एटीएम आणि चेकबुक्सही होती. हा सगळाचा प्रकार चक्रावून सोडणारा होता.
नक्की घडलं काय ?
ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे घडली. दीपक मोरे असे त्या मयत भिकाऱ्याचे नाव आहे. तो मेहकर ते डोनगाव ह्या रस्त्यावरून सायकलवर जाताना एका अज्ञात दुचाकीस्वाराची त्याला धडक बसली व त्या अपघातात तो भिकारी गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी तातडीने रुग्णालयात भरती केले. परंतु,अकोला येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Nashik | शिवमहापुराण कथेसाठी ‘हे’ मैदान निश्चित; कार्यक्रमाला हवेत स्वयंसेवक
हा मृत भिकारी नेमका कोण आहे? तो कुठला याचा तपास पोलिस करत होते. त्यासाठी त्यांनी त्याचे उर्वरित सामान तपासण्यास सुरूवात केली व ते बघून पोलिसांनाच धक्का बसला. कारण त्या भिकाऱ्याकडे असलेल्या गोधडीत व थैलीत अनेक बँक पासबुक्स, एटीएम कार्ड्स, व गोधडीखालील पिशवीत लाखो रुपयांची चिल्लर आढळली. तसेच त्याच्या बँक पासबूकमध्ये लाखो रुपयांची नोंद असल्याचे पोलिसांना आढळले आहे.
या कागदपत्रांवरून हा मृत माणूस मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील दीपक मोरे नावाचा रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांचा शोध घेतला व त्याची सर्व कागदपत्रे, व पैसे त्यांच्याकडे दिले. पण, एका भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे एवढे मोठे घबाड सापडते, हे चक्रावणारे असून सध्या संपूर्ण जिल्ह्यात भिकाऱ्याचीच चर्चा सुरू आहे.
Manoj Jarange | ‘आधी गावबंदी, आता..’ जरांगेंकडून मराठ्यांना नवं आवाहन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम