धक्कादायक! पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलीसदेखील हैराण झालेले आहेत. विद्येच्या माहेरघर म्हणजे पुण्यात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. पुणे शहरात महिलांसोबत गुन्ह्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच एका तरुणासोबत अजब प्रकार घडल्याचे पहायला मिळत आहे. तरुणाला नग्न नाचायला लावून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची घटना पुण्यात घडल्याचे उघडकीस आलेले आहे.
Nashik | शिवमहापुराण कथेसाठी ‘हे’ मैदान निश्चित; कार्यक्रमाला हवेत स्वयंसेवक
फ्लॅटवर तुझा भाऊ आला आहे, असं तरुणाला खोटं सांगून त्याला बोलावून फ्लॅटवर घेतलं. त्यानंतर तरुणाला नग्न नाचायला सांगून त्याचा अश्लील व्हिडीओ शूट केला आणि तो गावाकडील व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलेला आहे. आरोपींनी पीडित तरुणाकडून जबरदस्तीने 60 हजार रुपये काढून घेतल्याचाही दावा केला जात आहे.
Manoj Jarange | ‘आधी गावबंदी, आता..’ जरांगेंकडून मराठ्यांना नवं आवाहन
या प्रकरणी 33 वर्षीय तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही घटना 13 ते 14 जुलै 2023 दरम्यान घडली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम