Skip to content

इंजीनिअरिंग महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू


द पॉईंट नाऊ: ‌ राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे बी.ई., बी. टेक. या इंजीनिअरिंग पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्ज दाख करण्या करिता ४ ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी १२ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलद्वारे जाहीर केले आहे. राज्यभरातील इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी सेलमार्फत जून महिन्यात प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. १५ सप्टेंबरला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, २१ सप्टेंबरपासून इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्याथ्र्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी, अर्ज भरणे यासोबतच आवश्यक ती कागपदत्रे जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

७ ऑक्टोबरला तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान त्यावर हरकती जमा करण्याची मुदत देण्यात आली असून, १२ ऑक्टोबरला अंतिम गुणवत्तायादी जाहीर केली जाईल.

या यादीतील विद्याथ्र्यांना १३ ते १५ ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयांचे पर्याय दाखल करता येणार आहेत. १८ ऑक्टोबरला पहिल्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची आणि त्यांना मिळालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली जाणार असून, संबंधित महाविद्यालयांमध्ये १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन फी, कागदपत्रे जमा करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.पहिल्या फेरीतील प्रवेशानंतर २२ ऑक्टोबरला दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्याथ्र्यांची यादी जाहीर केली जाणार आहे, तर १ नोव्हेंबरला तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान संस्थास्तरावरील प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, १७ नोव्हेंबरला प्रवेशाचा ‘कट ऑफ’ महाविद्यालयांना जाहीर करावा लागणार आहे.

महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून खुली
इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असली, तरी या अभ्यासक्रमाची महाविद्यालये १ नोव्हेंबरपासूनच खुली होणार आहेत. त्यानंतर केवळ तिसरी फेरी व संस्थास्तरावरील प्रवेश होणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!