Swabhimani | स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी राज्यकार्यकारणी समोर ठेवला राजीनामा

0
41
Swabhimani
Swabhimani

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यकार्यकारणीची बारामती येथे बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पुढील ध्येय धोरणांवरती विचारमंथन झाले. तसेच झालेल्या लोकसभा निवडणुकांबाबत व पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांबाबत चर्चा झाली.

या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक संदीप जगताप यांनी आपला राजीनामा राज्य कार्यकारणी समोर ठेवला. संघटनेच्या कामांसाठी बैठकांसाठी राज्यभर फिरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी राजीनामा देत असल्याचे प्रा. संदीप जगताप यांनी सांगितले. परंतु हा राजीनामा कार्यकारणीने एकमताने नामंजूर केला असून विधानसभेच्या निवडणुकांनंतर राजीनाम्यावर विचार करणार असल्याचे कार्यकारणीने सांगितले.

 

खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारणी समोर मी राजीनामा ठेवला. राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. वडिलांचे वय 72 झाले आहे. आई आजारी आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे. शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षापासून नवीन पुस्तक आलं नाही. लेखन बंद झालंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार आहे.

पुढील काही दिवसात राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा आहे. माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील देखील आपण सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी माझ्यावरती लहान भावासारखे प्रेम केले. माझे मत व केलेली छोटी- मोठी आंदोलने आपण राज्यभर पोहोचवली. त्याबद्दल नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचे मी अंतकरणातून ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

– संदीप जगताप 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here