Sushma Andhare | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा या आता कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकता. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथे शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन आहे. यावेळी बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून, त्यांनी ठाकरे यांच्यावर ईडी चौकशीची मागणी केली आहे. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.(Sushma Andhare)
तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी
उद्धव ठाकरे यांच्यामागे ईडी लावली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचारी कोण? हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला कळेल, तसेच शिंदे गटाचे ४० पैकी एका जरी आमदाराने ५० खोके घेतले आहे, असं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्याकडे जाऊन भांडी घासेन, आणि सिद्ध करू शकले नाही तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी असं आव्हानही यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं.(Sushma Andhare)
Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या अडचणी संपेना..; आता काय आहे प्रकरण..?
Sushma Andhare | बोलताना डोळ्याला झेंडूबाम लावा
यावर अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले असून त्या म्हणाय की,”रामदास कदम यांना उत्तर देऊन त्यांना महत्व देण्याची मला गरज वाटत नाही. मात्र, इतरांच्या मागे ईडी लावायची की नाही ते सोडून द्या. मात्र, रामदास कदम यांनी काहीही बोलताना आधी डोळ्याला झेंडूबाम नक्की लावावा, असं खोचक प्रत्युत्तर त्यांनी दिलं. पुढे त्या म्हणाल्या की, रामदास कदम हे भांडी घासण्यावर फार लवकर येत असतात. प्रत्येक व्यक्तीला आपली पात्रता ही इतक्या लवकर कशी काय कळते असा खोचक सवालही सुषमा अंधारेंनी यावेळी शिंदेंचे शिलेदार रामदास कदम यांना केला आहे.(Sushma Andhare)
गोळीबार होण्या इतपर्यंत गुंडागर्दी भाजपने वाढवली
काल गुहागर येथे घडलेल्या राणे समर्थक आणि ठाकरेंचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या घटनेवर उद्धव ठाकरे गटाकडे मुद्देच राहिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली असून, त्या म्हणाल्या की,”भाजपने अगदी थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होण्या इतपर्यंत गुंडांची गर्दी वाढवली असून घोसाळकरांचा मृत्यू असेल किंवा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ला असेल तिथपर्यंतची गुंडागर्दी भाजपने वाढवली असून, ही भाषा शोभत नसून देवेंद्र फडणवीस यांनी जरा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या.(Sushma Andhare)
Maratha Reservation | सरकारला मराठ्यांचा धाक; शिवजयंतीबाबत मोठा निर्णय
वाशीत लोकांच्या डोळ्यात धुळफेकण्याचा प्रयत्न
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर अंधारे म्हणाल्या की, “मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. मात्र, वाशीत अधिसूचना काढून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच सरकारमध्ये बसलेल्या कुठल्याही लोकांचा याबाबत काहीही अभ्यास नाही आणि अभ्यास असला तरीही जाणीवपूर्वक लोकांच्या भावनांसोबत खेळून आरक्षणाच्या नावावर अठरापगड जातीच्या लोकांमध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न हा शिंदे फडणवीस सरकारकडून केला जात आहे. (Sushma Andhare)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम