Maratha Reservation | सरकारला मराठ्यांचा धाक; शिवजयंतीबाबत मोठा निर्णय

0
83
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  गेल्या २६ जानेवारी रोजी वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या मसुद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून, यामुळे राज्यभरात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. १६ तारखेला ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या वतीने राज्यात बंदही पाळण्यात आला होता. (Maratha Reservation)

यावर तातडीने पाऊले उचलत राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले असून, काल राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालदेखील सरकारसमोर सादर करण्यात आला होता. तर, हा अहवाल मराठ्यांच्या बाजूने असून, यात मराठा मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याची माहितीही समोर आली होती.

Maratha Reservation | जरांगेंना आंदोलनाची गरज नव्हती; काय म्हणाले मुख्यमंत्री..?

दरम्यान, यातच आता मराठा आंदोलनाचे पडसाद हे आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्यावरही होऊ शकतात, अशी संभाव्य शक्यता गृहीत धरून १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सभास्थळात बदल करण्यात आले आहे. तसेच आंदोलनाचे पडसाद समोर ठेऊन तेथील आयोजक आणि जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली असून, या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत. (Maratha Reservation)

Maratha Reservation | मराठा समाजात रोषाचे वातावरण 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचा संघर्ष हा सुरूच असून, उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव देखील सुरू होता. मात्र, त्यांनी कुठलेही उपचार घेण्यास नकार दिला होता. तर, त्यांना झोपेत सलाईन लावण्यात आले होते, तेही त्यांनी काढून टाकले होते. सगेसोयरेच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीवर ते ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठोस पाऊले उचलली जात नसल्यामुळे राज्यातील मराठा समाजात राज्य सरकारविषयी प्रचंड रोष असून, याचीच धास्ती बाळगून शिवजयंतीच्या या शासकीय कार्यक्रमाच्या सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आले आहेत. (Maratha Reservation)  Maratha Reservation | नशिकचे आमदार ढिकलेंच्या घराबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

मनोज जरांगे आणि मराठा समाज मुंबईत दाखल होऊ नये, यासाठी राज्य सरकारने रातोरात काही निर्णय घेतले होते आणि जरांगे यांना काही आश्वासनेही दिली होती. मात्र, त्यांची अंमलबजाणी करण्यात आली नसल्यामुळे मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. जरांगेंची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाज पेटला आहे. त्यामुळे एकूणच स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने काही निर्णय घेतले आहेत. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. (Maratha Reservation)

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

दरवर्षी राज्य शासनाकडून आयोजित केला जाणारा शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम हा किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडत असतो. मात्र, राज्यात सध्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शिवनेरीवरील मुख्य सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याकरिता भारतीय पुरातत्त्व विभागाकडूनही तातडीने परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे जुन्नर येथे उपस्थित असून, ते स्वत: सर्व व्यवस्था पाहत आहेत. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये, म्हणून जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Maratha Reservation)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here