Sudhakar Badgujar | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणानंतर नाशिकचे नाव हे आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत होते आणि ते म्हणजे ‘सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता पार्टी प्रकरण’. दरम्यान, या केसमध्ये आता आणखी एक मोठी घडामोड झाली असून, नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्या प्रकरणी आणि मैत्रीपूर्ण संबंध राखल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यावर आता सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली असून, यावेळी ते म्हणाले की ” हा गुन्हा राजकिय सूडबुद्धीने दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता तब्बल ८ वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, यासाठी पोलिसांवरही प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. पण इतर पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय का?, असा सवालही यावेळी सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. (Sudhakar Badgujar)
याबाबत सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका काढली असून, ते म्हणाले की “खासदार हेमंत गोडसे यांचा एक कथित व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी चौकशी का केली नाही. त्यावेळी सीडीआर तपासले असते तर अनेक बाबी समोर आल्या असत्या. पण तब्बल आठ वर्षांनंतर आता माझ्यावर गैरकृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत आहे. तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवरही गुन्हे दाखल व्हायला हवे होते. त्यावेळी मी फक्त ५ मिनिट तिथे होतो. त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या इतर लोकांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी बडगुजर यांनी केली आहे.
Sudhakar Badgujar | बडगुजरांना जामीन मंजूर; पोलीस चौकशीची टांगती तलवार मात्र कायम
उद्धव ठाकरेंचे आशिर्वाद घेण्यासाठी चाललो
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, “खासदारांचेही मध्यंतरी काही व्हिडिओ व्हायरल झाले होते.मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही. हा विरोधकांना दाबण्याचा हा निंदनीय प्रयत्न सुरू आहे. पण जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी न्यायालयात जाईल. पण ८ वर्षापूर्वीच्या घटनेत गुन्हा दाखल झाला आहे याचे दुःख आहे. ६ वर्षानंतर केस बंद करण्याचा निर्णय सरकारचा आहे. मात्र, आम्ही केले ते पाप आणि त्यांनी केले ते पुण्य हे असं राज्य सरकार वागत आहे. उद्धव ठाकरे हे माझ्याबरोबर आहेत. आज मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी चाललो असल्याचं देखील सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. (Sudhakar Badgujar)
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंची आज ‘मोठी’ चौकशी; काय खुलासे होणार..?
Sudhakar Badgujar | नेमकं प्रकरण काय..?
१९९० च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर पार्टी केल्याचा एक कथित व्हिडिओ नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला होता.
तर, या प्रकरणी हिवाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशीची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेच्या वतीने बडगुजर यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, पोलिस तपासात बडगुजर पार्टीच्या ठिकाणी उपस्थित असून, त्यांनी काही भेटवस्तू देखील दिल्या असल्याचे तपासातून समोर आले आहेत. तर, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलम या अंतर्गत सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Sudhakar Badgujar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम