Maratha Reservation | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे मात्र सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम असून, त्यांनी उपोषण चालू ठेवले. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा कट रचल्याचे आरोप केले आणि ते मुंबईतील त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले.
रात्री एका गावात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे माघारी फिरले आणि अंतरवाली सराटीत दाखल झाले. याच दिवशी दुपारी त्यांनी ३ मार्चपर्यंत उपोषण स्थगित केल्याचेही जाहीर केले. याकाळात त्यांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तर, अंबडमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली. काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Maratha Reservation | जरांगेंच्या डोक्यावर ‘या’ नेत्याचा ‘वरदहस्त’..?; महिलेचे गंभीर आरोप
Maratha Reservation |मनोज जरांगेंची सरकारपुढे अट
यातच आता जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण स्वीकारण्याची तयारी दाखवली असून, यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. तर, यावेळी जरांगे म्हणाले की,” एसआयटी चौकशीचा आताच का निर्णय झाला?. कारण सरकारचे १० टक्के आरक्षण मी नाकारले. म्हणून एसआयटी स्थापन केली. राजकीय आरक्षण आम्ही मागतच नाहीये.”असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारने दिलेले ‘एससीबीसी’चे दहा टक्के आरक्षण घेण्यास तयार मनोज असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र हे ‘एससीबीसी’चे दहा टक्के आरक्षण एकूण पन्नास टक्के आरक्षणाच्या आतच पाहिजे असल्याची अट मनोज जरांगे यांनी सरकारपुढे ठेवली आहे.
आधी एसआयटीची गरज नव्हती मग आताच का..?
तसेच यावेळी ते एसआयटी चौकशीच्या मुद्द्यावर म्हणाले की,”आम्ही राजकीय आरक्षण मागतच नाही. त्यासाठी आम्ही बोलतदेखील नाही. पण ओबीसी आरक्षणात जे फायदे आहेत. ते आम्हाला मिळायला हवे. एका अधिवेशनात बोलता की, एसआयटी चौकशी नको. आणि आता दुसऱ्या अधिवेशनात चौकशीचे आदेश देताय. न्यायालय सांगत आहे की शांततेत आंदोलन करा. मग त्यानुसार आम्ही शांततेतच आंदोलन करत आहोत. पण गुन्हे दाखल केले जाताय. खुन्नस दाखवताय. तुम्ही आम्हाला फुगे फोड्याची बंदूक दाखवताय. पण मराठे घाबरत नाहीत.
Maratha Reservation | वृद्धांनी आमरण उपोषण करावे आणि जर..; असे होईल पुढील आंदोलन
मराठ्यांनाही सांगतो यांना ‘अहो जाओ’ करा
फडणवीस यांच्या वक्तव्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की,”अरे कारे केलं, अशी टीका त्यांनी माझ्यावर केली. मग यांना ‘अहो जाओ’ केल्यानंतर सगे सोयऱ्यांची मागणी हे मान्य करणार का? मग रोज यांना ‘अहो जाओ’ करतो. आणि मराठ्यांनाही सांगतो यांना अहो जाओ करायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही आहेत. पण त्यांनी समाजाच्या नाराजीची लाट ओढून घेऊ नये, असा खोचक टोला जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची विणणती केली यावर ते म्हणाले की,” त्यांची भावना ही समाजाच्याप्रति अगदी बरोबर आहे. पण सध्या हा आरसक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना आता कुठलाही राजकीय निर्णय नको. आणि तो माझा मार्गदेखील नाही. माझ्यासमोर आता ज्वलंत मुद्दा हा मराठा आरक्षण हाच आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम